Crop Loan : पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडता

Agriculture Loan : चार हजार कोटी रुपये पीककर्ज खरिपात वितरित करायचे होते. परंतु वितरण वेळेत झाले नाही. सुमारे ९० टक्के पीककर्ज वितरण खरिपात झाले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात रब्बीतही पीककर्ज वितरण गतीने सुरू नाही. अद्याप पीक कर्ज वितरण १० टक्केही झालेले नाही. सुमारे एक हजार कोटी रुपये पीक कर्ज रब्बीत खानदेशात वितरित होईल, त्यासंबंधी राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांनी गतीने कार्यवाही करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

चार हजार कोटी रुपये पीककर्ज खरिपात वितरित करायचे होते. परंतु वितरण वेळेत झाले नाही. सुमारे ९० टक्के पीककर्ज वितरण खरिपात झाले आहे. पण यात राष्ट्रीयीकृत बँकांनी मनमानी केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. खरीप हंगाम अधिकृतपणे जूनमध्ये सुरू झाला. पण खरिपातील पीककर्ज वितरण सप्टेंबरमध्येही पूर्ण किंवा हवे तेवढे झाले नाही.

Crop Loan
Crop Loan : सांगली जिल्ह्यात खरिपात १६८० कोटींचे पीककर्ज वितरण

आताही राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्ज वाटपात हात आखडता घेत आहेत. शेतकरी नव्या पीक कर्जाचे प्रस्ताव घेऊन बँकेत जात आहेत. परंतु बँका शेतकऱ्यांना शाखेत तिष्ठत ठेवले जाते. अनेकदा शाखाधिकारी, व्यवस्थापक नसतात, यामुळे प्रस्तावावर निर्णय होत नाही. नवे बँक खाते संबंधित बँकेत उघडले जात नसल्याची स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ७०० कोटी, धुळ्यात १५० आणि नंदुरबारात १५० कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे आहे. गेल्या वर्षीदेखील रब्बीत पीक कर्ज फक्त ६० टक्केच वितरित झाले होते. शासन किंवा प्रशासन पीक कर्ज वितरण लक्ष्यांक निश्चित करते, परंतु बँकांना पीक कर्ज निधीची व्यवस्था करावी लागते.

Crop Loan
Crop Loan : पीककर्जासाठी कागदपत्रांच्या जंत्रीने शेतकऱ्यांस मनस्ताप

जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्ज वाटपात आघाडीवर आहे. पीक कर्ज वितरण या बँकेने खरिपातही वेळेत सुरू केले. ग्रामीण भागात या बँकेच्या शाखा अधिक आहेत. तसेच सोसायट्यांच्या मदतीने किंवा माध्यमातून बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देते.

बँकेने पीक कर्ज वितरण इतर बँकांच्या तुलनेत सुरवातीपासून अधिक केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वितरण मात्र संथ गतीने सुरू असते, असा आरोप केला जात आहे. तसेच खरिपात नुकसान झाल्याने पीक कर्ज वसुली बंद करावी. वित्तीय अडचणी कोविडमुळे वाढल्या. कोरडवाहू, बागायतदार शेतकरी संकटात आहेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com