Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बीची अवघी ७१ टक्के पेरणी

मुकूंद पिंगळे

Nashik News : गेल्या खरिपात पर्जन्यमान कमी असल्याने पिकांवर परिणाम होताच. मात्र त्याची धग रब्बी हंगामात अधिक वाढली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामात दिसून आला आहे. यंदा रब्बीचा पेरा मागील वर्षीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी कमी झाला आहे. तो यंदा ७१.७४ टक्के आहे.

जिल्ह्यात मालेगाव, येवला, सिन्नर हे तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. तर चांदवड व नांदगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. देवळा, बागलाण, नांदगाव या तालुक्यांतील पेरा निम्म्याहून कमी आहे. तर मालेगाव, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ, निफाड, चांदवड व इगतपुरी तालुक्यांत तो निम्म्यावर आहे. दिंडोरी, येवला व सिन्नर तालुक्यांत पेरणीची समाधानकारक स्थिती आहे. सिन्नरमध्ये अवकाळी पावसावर शेतकऱ्यांनी रब्बी पेरा केल्याने जिल्ह्यात या तालुक्यातील पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे.

खरीप हंगामातील शेत खाली झाल्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बी पेरण्या झाल्या. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात पेरण्यांचा वेग दिसून आला; मात्र तो नंतर कमी झाल्याचेही पाहायला मिळाले. जिल्ह्यात गहू पेरा सर्वाधिक असतो. मात्र यंदा विहिरीतील पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने तो यंदा निम्म्यावर आल्याची स्थिती आहे.

निफाड तालुक्यात सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र निम्म्याहून कमी झाल्याची स्थिती आहे. तर दिंडोरी तालुक्यात गहू पेरा सर्वाधिक होऊन सरासरीपेक्षा अधिक क्षेत्र आहे. चारा व धान्य उपलब्धतेच्या अंगाने ज्वारी व मका पिकात वाढ दिसून आली आहे. सिन्नर तालुक्यात ज्वारी वाढली आहे. यांसह नांदगाव, येवला व चांदवड तालुक्यात पेरा वाढला आहे.

येवला व सिन्नर तालुक्यांत मका पिकाचे सर्वाधिक क्षेत्र वाढले आहे. यासह निफाड, मालेगाव व नांदगावात पेरा आहे. कडधान्य पिकातही हरभरा यंदा सरासरीपेक्षाही कमी आहे. गळीत धान्यपिकांचे सरासरी क्षेत्र अत्यल्प ५६.८ हेक्टर आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात गळीतधान्य पिकांचा पेरा शून्यावर आहे.

पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र (हेक्टर) टक्केवारी (ता. ४ जानेवारीअखेर)

ज्वारी ४,०५४.९८ ७,२७५.५ १७८.९८

गहू ६४,१५०.८५ ३७,६३१.९२ ५८.६६

मका ८,४१८.९ ९,३२६.८५ ११०.७८

इतर तृणधान्ये ३१ ७.२ २३.२२

हरभरा ३५,०८६.१६ २५,११३.०१ ७१.५८

इतर कडधान्ये १,७६७.३७ २१२२.५५ १२०.११

एकूण क्षेत्र १,१३,५७६.०६ ८१,४७७.२३ ७१.७४

तालुकानिहाय पेरणी स्थिती

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र (हेक्टर) टक्केवारी

मालेगाव १२,७७५ ६,९११ ५४.१

बागलाण १२,७५७ ५,३९० ४२.१५

कळवण ६,२३९ ४,९६५ ७९.५८

देवळा १,९५५ ४५१ २३.०७

नांदगाव ५,३१३ २,३७१.४ ४४.६३

सुरगाणा ३,२४३.६८ २,३३०.४ ७१.८४

नाशिक ३,२७८.८४ २,३८७.८ ७२.८२

त्र्यंबकेश्वर १,०८४.९४ ६,५८.४ ६०.६९

दिंडोरी १०,१७५.०८ १०,७१४ १०५.३

ईगतपुरी २,६५४.७६ २,०१९.२६ ७६.०६

पेठ १७५७.८४ ९२०.६ ५२.३७

निफाड १४८४९.५८ ८८८९.२७ ५९.८६

सिन्नर २०६७४.८८ १९२७६ ९३.२३

येवला ११३२१.८ १०६५३.४ ९४.१

चांदवड ५४९५.६६ ३५३९.७ ६४.४१

यंदा पाऊस पाणी कमी होता विहिरींना पण खूप कमी प्रमाणात पाणी असल्याने रब्बी पेरा खूप कमी प्रमाणात आहे. थोड्याफार प्रमाणात रब्बी लाल कांदा तसेच हरभरा व मालदांडी ज्वारी मध्यंतरी डिसेंबरच्या दोन-तीन तारखेला पाऊस झाला, त्यावेळेस हरभरा व ज्वारी पिके टाकण्यात आली. सध्या पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
दादाभाऊ दाभाडे, शेतकरी, माणिकपुंज, ता. नांदगाव
सगळीकडे पेरा यंदा कमी झालेला आहे. पाण्याची परिस्थिती वाईट असल्याने विहिरीला पाणी कमी असल्याने हा फटका आहे.
मल्हारी जाधव, शेतकरी, जवळके, ता. येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT