Rabi Sowing : तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी

Rabi Season : पाच जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन तर दोन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Latur News : लातुर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन तर दोन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टरवर रब्बीची पेरणी अपेक्षित होती. या अपेक्षेच्या तुलनेत ४ जानेवारी अखेर १४ लाख १२ हजार २६३ रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ती जवळपास १०३.५४ टक्के इतकी आहे. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रात लातूर, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यां सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन तर धाराशिव व परभणी जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : पुणे विभागात ७६ टक्के पेरण्या

तुरीच्या उत्पादनात घट

लातूर विभागातील पाचही जिल्ह्यांत तुरीचे सर्वसाधारण क्षेत्रात तीन लाख ४९ हजार २५३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात खरिपात दोन लाख पस्तीस हजार तीनशे तीस हेक्टर वर तुरीची पेरणी झाली. जवळपास ५० ते ६० टक्के तूर काढणी पूर्ण झाली असून, काही ठिकाणी शेंगा पक्वतेच्या तर काही ठिकाणी तूर काढण्याचे काम सुरू आहे. तुरीच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Rabi Sowing
Rabi Season : यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरील पीक संरक्षित

जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी प्रत्यक्ष टक्केवारी

लातूर २ लाख ८० हजार ४३९ ३ लाख ६४ हजार ४१४ १२९

धाराशिव ४ लाख ११ हजार १७२ ३ लाख ३६ हजार १७९ ८१.७६

नांदेड २ लाख २४ हजार ६३४ २ लाख ८० हजार ४४६ १२४

परभणी २ लाख ७० हजार ७९४ २ लाख २१ हजार ०५८ ८१.६३

हिंगोली १ लाख ७६ हजार ८९१ २ लाख १० हजार १६४ ११८.८१

रब्बी पीकनिहाय पेरणी क्षेत्र(हेक्टरमध्ये)

पीक सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी

रब्बी ज्वारी ३ लाख ७१ हजार ८५७ ३ लाख १९ हजार ६२२

गहू १ लाख ५६ हजार ५१९ १ लाख ०४ हजार ८४७

हरभरा ७ लाख ८६ हजार १२४ ९ लाख ३३ हजार०४७

करडई १९ हजार ५३१ ३ लाख ०१ हजार ८१८

रब्बी पीक अवस्था व कीड, रोग आक्रमण

रब्बी ज्वारी वाढी व पोटरीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे.

गव्हाचे पीक सध्या मुकुटमुळे फुटण्याच्या ते पोटरी अवस्थेत आहे.

हरभऱ्याची पिक सध्या फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत असून पिकावर घाटे अळीचा तसेच काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

करडईचे पीक सध्या वाढीच्या ते फुलोरा अवस्थेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com