Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : रब्बी कांदा लागवड स्थिर राहणार

Onion Production : खानदेशात रब्बीसाठी कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग आला आहे. यंदा लागवड मात्र स्थिर राहील, असा अंदाज आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बीसाठी कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग आला आहे. यंदा लागवड मात्र स्थिर राहील, असा अंदाज आहे. तसेच निसर्गावर कांदालागवड व पुढील उत्पादनाची गणितेही अवलंबून आहेत.

यंदा चांगला पाऊस खानदेशात झालेला आहे. वळवाचा पाऊस काही भागात झाला. त्यात कांदा रोपवाटिका निर्मितीसाठी कांदा बियाण्याची खरेदी शेतकरी अजूनही काही भागात करीत आहेत. लागवड डिसेंबरच्या मध्यात सुरू होईल, अशी स्थिती आहे. लाल कांद्याची अधिक लागवड होईल. यंदा सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे.

कांद्याचे दर स्थिर आहेत. गेल्या वर्षी खरिपातील किंवा नोव्हेंबरमध्ये काढणी झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १२०० रुपये दर मिळाला होता. तर किमान दर ५०० रुपये प्रतिक्विंटल, असा होता. नंतर एप्रिल, मे व आता जूनमध्येही उन्हाळ कांद्याला दर कमीच होता.

परंतु सध्या कांदा दर किमान कमाल तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. सरासरी दर अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल, असा मिळत आहे. कांद्याचे एकरी १२० क्विंटलवर उत्पादन काही शेतकऱ्यांनी घेतले आहे. रोपवाटिकानिर्मिती काही जण व्यावसायिक स्वरूपात करीत आहेत. तर काही शेतकरी बियाणे खरेदी करून आपल्या पुढील लागवडीच्या नियोजनासंबंधी कांदा रोपवाटिका तयार करीत आहेत.

चोपड्यात रोपवाटिका अधिक

व्यावसायिक रोपवाटिका चोपड्यातील अडावद, धानोरा, माचले, लासूर, मराठे आदी गावांसह यावलमधील साकळी, किनगाव, शिरसाड, चुंचाळे, आडगाव, डांभुर्णी, धरणगावमधील पथराड, चोरगाव, भुलपाटे, टहाकळी, दोनगाव, एरंडोलमधील खर्ची, रवंजे, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे आदी भागांत केल्या जात आहेत.

सुमारे १५० ते १८० हेक्टरवर या कांदा रोपवाटिका खानदेशात आहेत. अजूनही काही भागांत रोपवाटिका तयार केल्या जात आहेत. यंदा रोपवाटिकादेखील वाढलेल्या नसल्याची माहिती आहे. यामुळे लागवड स्थिर राहील, असे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT