Rabi Crop loan Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : ‘रब्बी’चे पीककर्ज वितरित, अद्यापही २५ टक्क्यांवरच

Loan Disbursed : सोलापूर जिल्ह्यातील बॅंकांनी केवळ ५१५ कोटी ४४ लाखांचेच म्हणजे २५ टक्क्यांपर्यतच कर्ज वितरित केले आहे.

Team Agrowon

Solapur News : यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार ९०७ शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत जिल्ह्यातील बॅंकांनी केवळ ५१५ कोटी ४४ लाखांचेच म्हणजे २५ टक्क्यांपर्यतच कर्ज वितरित केले आहे.

सोलापूर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या हंगामात कांदा, गहू, हरभरा या प्रमुख पिकांशिवाय डाळिंब, ऊस, केळी, द्राक्ष यासारख्या फळपिकांची कामेही मोठयाप्रमाणात सुरु असतात. जिल्ह्यात रब्बी हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू झाला असून,

आतापर्यंत तीन महिन्यांत बॅंकांनी १५ डिसेंबरपर्यंत अवघे २५ टक्केच कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६४ हजार ९०७ शेतकऱ्यांना कर्जवाटप अपेक्षित आहे. पण अद्यापही तब्बल एक लाख ३५ हजार ९९१ शेतकऱ्यांना पीककर्ज मिळू शकलेले नाही.

जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा व बार्शी या पाच तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळ जाहीर झाला आहे. तर इतर तालुक्यांमधील ४६ महसूल मंडलांमध्येही दुष्काळी स्थिती असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

या पार्श्वभूमीवर कर्जवाटपाला वेग यायला हवा, पण तसे होताना सध्या तरी दिसत नाही. जिल्हा प्रशासनाकडूनही अग्रणी बँक आणि संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

फक्त २९ हजार शेतकऱ्यांना कर्ज

रब्बी हंगामातील एकूण कर्जवाटपाचे उद्दिष्ट जवळपास २००१ कोटी रुपये आहे, तर त्यापैकी आतापर्यंत ५१५ कोटी ४४ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. तसेच १ लाख ६४ हजार ९०७ शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित आहे, पण आतापर्यंत फक्त २८ हजार ९१६ शेतकऱ्यांनाच कर्ज मिळालेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT