Rabi Crop Loan : जिल्हा बॅंकेकडून रब्बीसाठी अवघे अडीच कोटींचे कर्जवाटप

Rabi Season : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून यंदा रब्बी हंगामासाठी १६.३२ कोटी कर्जवाटपाचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले असून, यापैकी आतापर्यंत १७० सभासदांना २.८० कोटी म्हणजेच अवघे १७ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे.
Crop Loan
Crop Loan Agrowon

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून यंदा रब्बी हंगामासाठी १६.३२ कोटी कर्जवाटपाचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले असून, यापैकी आतापर्यंत १७० सभासदांना २.८० कोटी म्हणजेच अवघे १७ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बॅंकेकडे निधी नसल्याकारणाने तसेच जिल्ह्यातील दुष्काळामुळे पीककर्ज वाटपाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे देवळा, इगतपुरी, नांदगाव, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत एकाही शेतकऱ्याने अद्यापपर्यंत पीककर्ज घेतलेले नाही.

Crop Loan
Rabi Crop Loan : रब्बी पीककर्ज वाटपातही बँकांचा आखडता हात

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी ६१५ कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. यात खरीप हंगामासाठी ५९८.६८ कोटींचे उद्दिष्ट होते. यापैकी ४८ हजार ७२१ शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०२३ अखेर ४५७.११ कोटींचे कर्जवाटप झाले. ही टक्केवारी ७६ टक्के इतकी होती. ल्या वर्षी ५० हजार ६५० शेतकऱ्यांना ऑक्टोबर २०२२ अखेर ४४६.८२ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. हे सरासरी ८१ टक्के होते.

Crop Loan
Rabi Crop Loan : खानदेशात रब्बीसाठीही पीककर्ज वितरण संथ

यंदा रब्बी हंगामासाठी १६.३२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. रब्बी हंगामासाठी १ ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. १६ डिसेंबरअखेर शेतकऱ्यांना २.८० कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. तर, राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत सहा शेतकऱ्यांना ९.४० लाख रुपयांचे कर्जवाटप झाले.

दुष्काळाचा फटका

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. धरणात पाणीसाठाही कमी आहे, त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. येवला, सिन्नर, मालेगाव तालुके दुष्काळी जाहीर झालेले आहेत. निम्म्याहून अधिक तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. कमी प्रमाणात पाणी असल्याने यंदा रब्बी पेरण्याही कमी झाल्या आहेत. परिणामी, पीककर्जही शेतकऱ्यांनी घेतले नसल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com