Purna Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : पूर्णा कारखान्याचे ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Season : पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० ते ११ लाख टन उसाची नोंद आहे. या वर्षी ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.

Team Agrowon

Nanded News : पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० ते ११ लाख टन उसाची नोंद आहे. या वर्षी ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून सभासदांनी आपला ऊस पूर्णा कारखान्याला द्यावा, असे प्रतिपादन पूर्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सोमवारी (ता. ६) केले.

पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन सोहळा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. आमदार राजू नवघरे यांची प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनीलराव कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. शिला कदम, संचालक बालासाहेब बारहाते, मीरा बारहाते, संचालक श्रीधर पारवे, गंगासागर पारवे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनीलराव कदम, डॉ. शिला कदम, माजी आमदार पंडितराव देशमुख, संचालक बालासाहेब बारहाते, शहाजी देसाई, प्रल्हादराव काळे, कार्यकारी संचालक सुनील दळवी, बाजार समितीचे सभापती तान्हाजी बेंडे, जिल्हा बँकेचे संचालक आंबादासराव भोसले, बालाजी ढोरे, सुभाष लालपोतू यासह संचालक, सभासद यांची उपस्थिती होती.

दांडेगावकर पुढे म्हणाले, की साखर कारखानदारी ही केवळ साखरेच्या उत्पादनापुरती मर्यादित न राहता एनर्जी हब बनली आहे.ऊर्जा ही जगाची अन्नाएवढीच गरज बनली असल्याने ऊस चांगले दिवस येणार आहेत. ऊर्जा ही जगाची गरज बनल्याने काहीही भाव द्यायला तयार आहेत.

यासाठी साखर कारखाने टिकवणे गरजेचे आहे. त्यामुळे येथून पुढे साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादकांना चांगले भवितव्य आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT