Sugarcane Transport Crime : ऊस वाहतूकदारांना फसवलेल्या ठेकेदारांवर कारवाई, पोलिसांची १६ पथके रवाना

SP Mahendra Pandit : पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक केलेल्या ठेकेदारांची धरपकड पोलिसांकडून केली जात असल्याचे सांगितलं.
Sugarcane Transport Crime
Sugarcane Transport Crimeagrowon

Sugarcane News : मागच्या १० वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दरम्यान ऊस वाहतूकदारांना फसवणाऱ्या टोळी मुकादमांवर कारवाई होत नसल्याने या घटनांमध्ये वाढच होत होती. परंतु मागच्या काही महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात ऊस वाहतूकदारांच्या पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेत कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक केलेल्या ठेकेदारांची धरपकड पोलिसांकडून केली जात आहे. ऊस तोडणी मजुरांच्या बीड, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, लातूर, परभणी जिल्ह्यांमध्ये पोलिसांची १६ पथके रवाना झाली आहेत. आजवर ४० संशयितांना अटक झाली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. फसवणूक केलेल्या संशयितांच्या मालमत्तांवर बोजा चढवणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास ठेकेदारांकडून शेतकऱ्यांची सुमारे शंभर कोटींपेक्षा जास्त फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये बारा जिल्ह्यातील १ हजार २६९ ठेकेदार संशयित असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी कारवाईची धडक मोहिम राबवली आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने स्वतंत्र पथक नेमून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. तपासातील ३८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. याचबरोबर आणखी काहींनी लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची सांगण्यात आले. या प्रकरणात २०१६ पासून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडून फिर्यादी घेऊन मोहीम राबविली गेली. यंदाच्या गळीत हंगामात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस दक्ष आहेत.

फसवणूक केलेल्या संशयिताचा शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रकृती अस्वास्थ्य किवा अन्य कारणांमुळे ज्या संशयितांना अटक करणे शक्य नाही, त्यांना नोटीस देऊन न्यायालयात हजर राहण्यास सांगितले जाते. फसवणुकीतील रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त करून त्यावर बोजा चढवण्याचे काम केले जात आहे.

प्रामुख्याने ऊस तोडणीसाठी टोळी आणतो, त्या पोटी आगाऊ रक्कम उचलणे, टोळी न दिल्याने पैस परत मागण्यासाठी गेलेल्या शेतकन्यांना दमदाटी असे या फसवणूक प्रकरणातील गुन्हे आहेत.

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत असे गुन्हे नोंद आहेत. वारंवार असे प्रकार घडू लागल्यामुळे पोलिसांनी फिर्याद घेण्याची मोहीमच गेले काही महिने उघडली होती. त्यातून २०१६ पासून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी फिर्यादी नोंदविल्या. त्याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली होती. पथकाने संबंधित संशयितांना आणण्याचे काम आता वेगाने सुरू केले आहे.

याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊस तोडणी ठेकेदार वा टोळ्यांकडून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथकांकडून १२ हून अधिक जिल्ह्यांत तपास सुरू केला आहे. पोलीस रेकॉर्डवर आलेली फसवणूक ९२ कोटींहून अधिक आहे. फसवणुकीचे हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com