Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : तेवीस दिवसांत दोन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Soybean Procurement Center : सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेऊन लातूर जिल्ह्यात चौदा तर धाराशिव जिल्ह्यात १६ खरेदी केंद्र सुरू केली.

विकास गाढवे

Dharashiv News : सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेऊन लातूर जिल्ह्यात चौदा तर धाराशिव जिल्ह्यात १६ खरेदी केंद्र सुरू केली. या केंद्रावर १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी सुरु झाली असून त्यापूर्वीपासून सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु झाली आहे.

आतापर्यंतच्या २३ दिवसात दोन्ही जिल्ह्यात केवळ दोन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाली असून सोयाबीनमधील ओलाव्याचीच प्रमुख अडचण खरेदीला येत आहे. सोयाबीन खरेदीला बारा टक्के ओलावा गृहित धरला जातो. प्रत्यक्षात सध्या हा ओलावा १६ ते १७ टक्के असून मागील काही दिवसात ऊन वाढल्याने हा ओलावा कमी होऊन काही दिवसात सोयाबीन खरेदीला वेग येण्याची आशा आहे.

धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार २०३ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली असून जिल्ह्यातील १६ केंद्रावर आतापर्यंत ५१ शेतकऱ्यांच्या एक हजार १५१ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील १४ केंद्रांसाठी एक हजार नऊशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत एक हजार २४ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. काही दिवसापूर्वी बारदानाची अडचण होती.

ही अडचण दूर झाली असून आता केवळ ओलावाचीच अडचण आहे. काही दिवसापासून ऊन पडत असून त्यामुळे सोयाबीनमधील ओलावा कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन कडक उन्हामध्ये वाळवल्यास ओलावा कमी होणार आहे. केंद्रावर सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी समृद्धी पोर्टलची नवीन ०.२ प्रणाली सुरु करण्यात आली असून त्यावरून तातडीने नोंदणी करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.

...तर दोन दिवसांत शेतकऱ्यांना पेमेंट

खरेदी केंद्रावरून सोयाबीन वेअर हाऊसमध्ये जमा केल्यानंतर दोन दिवसात शेतकऱ्यांना सोयाबीनची हमीभावानुसार होणारी रक्कम खात्यावर मिळणार आहे. यासाठी नाफेडकडून स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. वेअर हाऊसमध्ये सोयाबीन जमा होताच दोन दिवसात पावती तयार होऊन पेमेंट जमा होणार आहे.

मात्र, त्यासाठी किमान एक गाडी भरेल एवढे सोयाबीन केंद्रावर खरेदी होण्याची गरज आहे. एका गाडीत दोनशे कट्टे सोयाबीन वाहून नेले जाते. काही शेतकऱ्यांचा मिळून केंद्रावर दोनशे कट्टे खरेदी झाले तर शेतकऱ्यांना सोयाबीनची रक्कम तातडीने मिळणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे यांनी दिली.

नाफेडच्या निकषानुसार सोयाबीनचा ओलावा (हवा) बारा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये ओलावा १६ ते १७ टक्क्यापर्यंत असल्यामुळे खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांना परत जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केंद्रावर येण्यापूर्वीच सोयाबीन वाळवून आणावे, जेणेकरून शेतकऱ्यांना केंद्रावरून सोयाबीन परत घेऊन जाण्याची वेळ येणार नाही.
मनोज बाजपेयी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT