Crop Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीककर्ज वितरणात पुणे जिल्ह्याचा विक्रम

Agriculture Loan : जिल्ह्यात पीककर्ज वाटपामध्ये सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक गाठत २०२३-२४ या वर्षात ३१ डिसेंबर अखेर ५ हजार ७६३ कोटी रुपये इतके पीककर्ज वाटप झाले आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात पीककर्ज वाटपामध्ये सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक गाठत २०२३-२४ या वर्षात ३१ डिसेंबर अखेर ५ हजार ७६३ कोटी रुपये इतके पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने सर्व बँकांना पीक कर्जासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते.

गेल्या वर्षी (२०२२-२३) मध्ये ५ हजार २० कोटी रुपये तर २०२१-२२ मध्ये ३ हजार ८९३ कोटी पीककर्ज वाटप जिल्ह्यात झाले होते. यावर्षी पीक कर्जासाठी राबविण्यात आलेल्या अभियानामुळे ३१ डिसेंबर अखेर ५ हजार ७६३ कोटी रुपयांचा टप्पा पार केल आहे.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीककर्ज मिळावे यासाठी आर्थिक वर्षाच्या प्रारंभापासूनच सर्व बँकांचा वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा आणि अभियान राबविण्यात आले होते. खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाबाबत वेळोवेळी बँकाची जिल्हा पातळीवर बैठक घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयीकृत बँका, खासगी क्षेत्रातील बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जास्तीत जास्त पीककर्ज वाटपासाठी प्रोत्साहित केले.

या सर्व प्रक्रियेत जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पुणे शहर परिमंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक राजेश सिंग व सध्याच्या महाव्यवस्थापक श्रीमती अपर्णा जोगळेकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

या सर्व कर्ज वाटपामध्ये राज्य स्तरावरील बँकर्स कमिटीच्या सर्व सदस्य बँकांचे जिल्हा समन्वयक तसेच क्षेत्रीय व्यवस्थापक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अग्रणी बँक कार्यालयातील प्रमोद सुर्यवंशी, पी. एस. सरडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. कारेगावकर यांनी दिली आहे.

उद्दिष्टाच्या १०५ टक्के कामगिरी

यावर्षीच्या ५ हजार ५०० कोटी रुपये एवढ्या उद्दिष्टापेक्षा २६३ कोटी रुपये अधिक कर्ज वाटप करून उद्दिष्टाच्या १०५ टक्के कामगिरी केली आहे. यामध्ये मत्स्य व्यवसायासाठी २ कोटी २ लाख रुपये तसेच पशुपालनासाठी १७ कोटी ७६ लाख रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे. फेब्रुवारी आणि मार्चची आकडेवारी समोर आल्यावर यामध्ये आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT