Nanded News : नांदेड जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ‘नाबार्ड’च्या सहा हजार ७२१ कोटी रुपयांच्या ‘पोटँशिअल लिंक्ड क्रेडिट प्लॅन’ (पीएलपी) अर्थात संभाव्ययुक्त ऋण योजनेला अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी नुकतीच मंजुरी दिली. यात खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वितरणाच्या उद्दिष्टात १०६ कोटींची वाढ करून तीन हजार १४ कोटींच्या संभाव्ययुक्त पीक कर्जाची तरतूद केली आहे.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) जिल्हा विकास प्रबंधक (डीडीएम) दिलीप दमय्यावार यांनी या योजनेचा आराखडा तयार केला आहे. बोरगावकर यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत या योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी ‘आरबीआय’चे एलडीओ अरुण बाबू, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गजके, ‘एमजीबी’चे विभागीय व्यवस्थापक संतोष भागवती, ‘आरएसईटीआय’चे संचालक श्री शर्मा, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडीले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे उपस्थित होते.
संभाव्ययुक्त ऋण योजनेमध्ये जिल्ह्यातील खरीप तसेच रब्बीमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी तीन हजार १४ कोटी रुपयांची संभाव्य तरतूद केली आहे. मागील वर्षी पीककर्ज योजनेसाठी दोन हजार ९०८ कोटींची तरतूद होती. या तुलनेत यामध्ये १०६ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांतील शेतकरी आत्महत्या
वर्षे एकूण प्रकरणे पात्र अपात्र
२०१९ ८५ ५४ ३१
२०२० ६४ ४९ १५
२०२१ ८३ ६५ १८
२०२२ ७७ ५७ १०
२०२३ १०३ ५७ ३७
योजनानिहाय निधीची तरतूद (कोटी)
जलसंधारण ६४
कृषी यांत्रिकीकरण ७३
वृक्ष लागवड व फळबाग ६२
वनक्षेत्र व पडीक जमीन विकास योजना १
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय १३४
शेळी व मेंढी पालन व्यवसाय ४३
मत्स्यव्यवसाय १५
कृषी पायाभूत सुविधा १०३
अन्न प्रक्रिया उद्योग ४७९
सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग १६३२
बचत गट व इतर क्षेत्र ९०९
एकूण सहा हजार ७२१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.