Agriculture Mechanization Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरणासाठी बेनीनला तांत्रिक सहकार्य करू

Agriculture News : बेनीन देशातील तरुण शेतीमध्ये काम करण्यास तयार नसल्यामुळे त्या देशात शेतमजुरांचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : बेनीन देशातील तरुण शेतीमध्ये काम करण्यास तयार नसल्यामुळे त्या देशात शेतमजुरांचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे भविष्यात शेतीमधील सर्व कामे ही मशिनच्या सहाय्याने करावी लागणार आहेत. भारतामध्ये कृषी यांत्रिकीकरणात मोठे संशोधन झाले असून ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने करावयाच्या मशागतीच्या कामांमध्ये झालेल्या यांत्रिकीकरणात भारत जगात पुढे आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातदेखील कृषी यांत्रिकीकरणात मोठे संशोधन झाले असून विद्यापीठाच्या माध्यमातून बेनीनमध्ये कृषी यांत्रिकीकरणासाठी तांत्रिक सहकार्य करू, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात बेनीन देशात कृषी यांत्रिकीकरणाच्या सहकार्यासाठी व कृषी यंत्राच्या चाचणी प्रमाणपत्राच्या कार्यवाहीसाठी दोन दिवस बैठका झाल्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. पाटील होते.

संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, बेनीन येथील कृषी, पशु व मत्स्य मंत्रालयातील अधिकारी व ग्रामीण अभियांत्रिकीचे तांत्रिक मार्गदर्शक डॉ. गॉनट्रॅन्ड बगान, राष्ट्रीय कृषी विद्यापीठातील संशोधन सहायक आइना बोको, कृषी यांत्रिकीकरण राष्ट्रीय सोसायटीच्या प्रकल्प व्यवस्थापक मारी लिगन,

बेनीन ग्रामीण अभियांत्रिकीच्या यांत्रिकीकरण सेवेचे प्रमुख लासीसी आदिबी, राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेचे संशोधन सहायक हुगे झॅनाउ, कृषी यांत्रिकीकरणातील तांत्रिक मार्गदर्शक ज्युलस होडोनु, ऑसपीसेस डॅडजो व जीआयझेडचे भारतातील समीर वालडीया, कृषी यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे व अ.भा.स.कृषी अवजारे व यंत्रे सुधार प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, की महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये असलेल्या चाचणी केंद्रामध्ये विविध कंपन्यांनी तयार केलेली कृषी अवजारे, यंत्रे यांच्या चाचण्या घेतल्या जातात. कमी इंधन वापर, क्षमता, वापरातील उपयोगिता, सुरक्षितता व डीझाईन या घटकांवर आधारित चाचण्या होऊन या कृषी यंत्रांना प्रमाणपत्र दिले जाते.

यानंतरच संबंधित कंपन्यांना ही यंत्रे वा अवजारे विक्री करण्यास मुभा मिळते. विद्यापीठाच्या तांत्रिक सहकार्याने अशा प्रकारचे चाचणी केंद्रे बेनीनमध्ये उभारण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दिलीप पवार यांनी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. डॉ. गॉनट्रॅन्ड बगान यांनी सादरीकरण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT