Deputy Collector Manisha Kumhar Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : ‘पीएम किसान’साठी स्वतंत्र मनुष्यबळ द्या, अन्यथा कामावर बहिष्कार

Agriculture Scheme : पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळ आणि कार्यालयीन सुविधा द्याव्यात, अन्यथा येत्या १ जुलैपासून या योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल.

Team Agrowon

Solapur News : पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळ आणि कार्यालयीन सुविधा द्याव्यात, अन्यथा येत्या १ जुलैपासून या योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कृषीसेवा वर्ग-२ राजपात्रित अधिकारी कल्याणकारी संघटनेच्या सोलापूर शाखेने दिला आहे.

संघटनेच्या महिला उपाध्यक्षा मनीषा मिसाळ, तंत्र अधिकारी बसवराज मंगरुळे, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांच्यासह संघटनेच्या अन्य सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना मागण्यासंबंधी निवेदन देत हा इशारा दिला.

पंतप्रधान शेतकरी सन्मान (पीएम किसान) ही योजना २०१९ पासून सुरू आहे. या योजनेची अंमलबजावणी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार केली आहे. सुरुवातीला या योजनेचे नियंत्रण महसूल विभागाकडे होते, पण महसूल विभागाने नकार दिल्यानंतर ही जबाबदारी कोणतेही अतिरिक्त मनुष्यबळ आणि सुविधा न देता कृषी विभागाकडे आली.

संघटनेच्या मागणीनंतर कृषिमंत्री, कृषी सचिव, आयुक्त यांच्यास्तरावर या कामासाठी कृषी विभागाला स्वतंत्र मनुष्यबळ देण्याचे ठरले, पण त्याची अंमलबजावणी चार महिन्यानंतरही अद्याप झालेली नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आता अडचणी येत आहेत.

वास्तविक ही योजना राबवण्याची जबाबदारी कृषी विभागासह महसूल, ग्रामविकास यांची आहे. पण सध्या केवळ कृषीकडेच बोट दाखवले जाते. या योजनेच्या सर्व तक्रारी थेट कृषी विभागाकडे येतात. त्यात पोर्टलच्या तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे तातडीने स्वतंत्र मनुष्यबळ द्यावे, अन्यथा कामावर बहिष्काराचा इशारा निवेदनात देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता; राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज

Khandesh Rain Damage: खानदेशात पावसाने १८ हजार हेक्टरला फटका

Maize Procurement Issue: बाजारात मका दर हमीभावापेक्षा कमी

Farm Subsidy Delayed: कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Mango Crop Compensation: आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT