Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Agriculture Department : राज्याच्या कृषी विभागाला जैविक इंडिया पुरस्कार प्रदान

Farmer News Maharashtra : अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व वर्धा या विदर्भातील आत्महत्याग्रस्त/नैराश्यग्रस्त सहा जिल्ह्यांत २०१८-१९ पासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Published on

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या अंमलबजावणीसाठी बंगळुर येथील इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक ॲग्रीकल्चर यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा ‘जैविक इंडिया ॲवार्ड २०२३’ राज्य शासनाच्या कृषी विभागाला नुकताच दिल्ली येथील समारंभात प्रदान करण्यात आला. ‘आत्मा’चे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी अधीक्षक कार्यालयात रेंगाळल्या फायली

अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व वर्धा या विदर्भातील आत्महत्याग्रस्त/नैराश्यग्रस्त सहा जिल्ह्यांत २०१८-१९ पासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Agriculture Department
Agriculture Department : चाळीसगाव कृषी विभागात कर्मचाऱ्यांची वनवा

योजनेत नऊ हजार २६८ शेतकऱ्यांचे १५ हजार ६८२ हेक्टर क्षेत्र सेंद्रिय प्रमाणिकरणाखाली आणण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २० हेक्टर क्षेत्राचे ४३५ गट स्थापन करण्यात आले असून त्या गटांच्या ४० शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे एकूण दोन कोटी ८२ लाख रुपये भागभांडवल जमा झाले आहे. योजनेत १२ किरकोळ विक्री केंद्र, १७ समूह संकलन केंद्र, महासंघ ऑरगॅनिक मिशन (MOM) नावाचा ब्रँड तयार करण्यात आला असून या ब्रँडच्या नावाने सेंद्रिय शेतमालाची विक्री करण्यात येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com