Shaktipith Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipith Highway : ‘शक्तिपीठ’प्रश्‍नी सांगलीत १९ गावांत आंदोलने

Land Acquisition : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी (ता. ८) कृती समितीच्या वतीने जिल्हाभरात प्रतिकात्मक आंदोलने झाली.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी (ता. ८) कृती समितीच्या वतीने जिल्हाभरात प्रतिकात्मक आंदोलने झाली. बाधित शेतकऱ्यांनी या मागणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रतिकात्मक आंदोलन केले. बाधित शेतकऱ्यांनी आपापल्या शिवारात, जनावरांच्या गोठ्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयात फलक लावून त्यासमोर प्रतिकात्मक धरणे आंदोलन केले.

२३ मार्च रोजी सांगलवाडी येथे झालेल्या महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ एप्रिलला आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता. तथापि आचारसंहितेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारली. त्यानंतर कृती समितीने सोमवारी प्रतिकात्मक आंदोलन केले. या वेळी १९ गावांतील शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदविला.

शक्तिपीठ महामार्गामुळे शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, गव्हाण, वज्रचौंडी, मणेराजुरी, मतकुणकी, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडीसह १९ गावांतील शेतजमिनी बाधित होत आहेत. तेथील शेतकऱ्यांनी कृती समितीच्या आवाहनास प्रतिसाद देत आंदोलन केले.

या भागात सिंचन योजना बऱ्यापैकी पूर्ण झाल्यामुळे सर्व जमिनी बागायती झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी जिरायती असलेल्या जमिनी कर्ज काढून विकसित केल्या आहेत. शासनाने वेळोवेळी २०१३ च्या जमीन अधिग्रहण कायद्यातील मोबदल्यातील कलमांमध्ये दुरुस्ती केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. म्हणून हा महामार्ग रद्द करून अस्तित्वात असलेल्या पर्यायी महामार्गाचा उपयोग करून महाराष्ट्रातील देवस्थाने जोडावीत, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.

या आंदोलनात उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे, उदय पाटील, शवंत हारुगडे, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, घनश्याम नलावडे, भूषण गुरव, पैलवान विष्णू पाटील, उमेश एडके, विलास थोरात, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील आदी शेतकऱ्यांनी भाग घेतला.

जिल्ह्यातील १९ गावांत प्रतिकात्मक आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला. पुढच्या टप्प्यात राज्यव्यापी मेळावा घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर हा मेळावा पंढरपूर परिसरात घेतला जाईल. शासनाने आमच्या मागण्यांची योग्य दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल.
- उमेश देशमुख, प्रदेश अध्यक्ष, किसान सभा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT