Water March Agrowon
ॲग्रो विशेष

Water Issue : वैजापूर सिंचन विभागावर पाण्यासाठी आक्रोश मोर्चा

March for Water : आधार शेतकरी जलदूत समितीचे प्रमुख पंडित अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील नांदूर मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतर्फे शुक्रवारी (ता. ३) प्रचंड उन्हात पाण्याचे उन्हाळी आवर्तन मिळावे याकरिता आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : आधार शेतकरी जलदूत समितीचे प्रमुख पंडित अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील नांदूर मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतर्फे शुक्रवारी (ता. ३) प्रचंड उन्हात पाण्याचे उन्हाळी आवर्तन मिळावे याकरिता आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मागण्यांविषयी निर्णय न झाल्याने शेतकरी वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून होते.

यावर्षी मराठवाड्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी, पाण्याची तीव्र टंचाई आहे. चाऱ्याअभावी पशुधनाचे हाल होत आहेत. अशा स्थितीत नियमाप्रमाणे नांदूर मधमेश्वर जलद कालव्यास गंगापूर, वैजापूर तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजतागायत पाणी सोडणे गरजेचे होते.

यासंदर्भात आधार शेतकरी जलदूत समितीतर्फे वेळोवेळी पाठपुरावा करूनही उन्हाळी पाणी आवर्तन सोडलेले नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले. शेतकरी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून होते.

श्री. शिंदे म्हणाले,‘‘प्रशासनाकडून उत्तर देण्याऐवजी बैठक सुरू आहे असे सांगण्यात येत होते. परंतु पाणी सोडण्याची तारीख निश्चित करून तसे लेखी दिले जात नाही तोवर आम्ही परत जाणार नाही असा निर्णय घेतला. कार्यालयीन वेळेपर्यंत आक्रोश मोर्चा व कार्यालयीन वेळ संपल्यानंतर आमच्या मागण्यांनुसार निर्णय झाला नाही तर बेमुदत उपोषण करण्याची तयारी केली आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage: युरिया, डीएपी, पोटॅश, एनपीके ग्रेडच्या खतांचा कमी पुरवठा

Monsoon Preparedness Concerns: मॉन्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

Solid Waste Management: घनकचरा व्यवस्थापनासाठी पिंपळगाव बसवंतला सव्वासात कोटी

Rural Water Crisis: महाड तालुक्यात गावे तहानलेली

Shaktipeeth Highway Protest: खाकी वर्दीची दडपशाही खपवून घेणार नाही, शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी संतप्त, विटा 'तहसील'वर आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT