Farmer Hunger Strike : पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

Farmer Demand on Water : तीर्थपुरी (ता. घनसावंगी) सीआर क्रमांक ७३ येथून शिवणगाव-राजाटाकळी उच्च पातळी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
Farmer Hunger Strike
Farmer Hunger StrikeAgrowon
Published on
Updated on

Jalna News : तीर्थपुरी (ता. घनसावंगी) सीआर क्रमांक ७३ येथून शिवणगाव-राजाटाकळी उच्च पातळी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांनी बुधवार (३१ जानेवारी)पासून सीआर क्रमांक ७३ डाव्या कालव्याजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे.

राजाटाकळी-शिवणगाव बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा नसताना देखील प्रशासकीय आदेशानुसार बंधाऱ्याखालील गावांना बंधाऱ्यातून पाणी सोडले होते. ज्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याचे सर्व पिके हातातून निघून गेली असून आता शेवटी राहिलेली ऊस पिके व जनावरांचा प्रश्‍न गंभीर होत आहे.

Farmer Hunger Strike
Farmers' Hunger Strike : जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक, तरी तोडगा नाहीच

यासाठी मागील महिन्यात जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या छत्रपती संभाजीनगरसह पैठण, घनसावंगी, तीर्थपुरीच्या कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीचे निवेदन दिले व उपोषणाचा इशारादेखील देण्यात आला होता.

Farmer Hunger Strike
Water Scarcity : दवणेमळा, कुंभारकरवाडी परिसरात टॅंकरने पाणीपुरवठा

मात्र जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून कुठलीही हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांनी बुधवारपासून डाव्या कालव्याजवळ उपोषणाला सुरुवात केली आहे. या वेळी प्रशासनाने पाणी सोडले तर ठीक, नाही तर आमचे आमरण उपोषण चालूच राहणार आहे, असे उपोषणकर्ते बाळासाहेब तौर व विनोद तौर यांनी सांगितले.

उपोषणासाठी शिवणगाव, उक्कडगाव, राजाटाकळी, मुद्रेगाव, मंगरूळ, शेलगाव, बीड जिल्ह्यातील ढालेगाव, गोपत पिंपळगाव, तपे लिंबगाव, रामपुरी, अंतरवाला या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com