Women Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Women Protest : वेळागरमधील महिलांचे खाडीत उतरून आंदोलन

Land Acquisition : शिरोडा वेळागर येथील १२० एकर जमीन पर्यटन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ला) येथील पर्यटन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या क्षेत्रापैकी ९ हेक्टर क्षेत्र वगळण्यात यावे या मागणीसाठी वेळागर येथील महिलांनी शुक्रवारी (ता. १६) खाडीत उतरून आंदोलन केले. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देखील शेतकरी महिलांनी दिला.

शिरोडा वेळागर येथील १२० एकर जमीन पर्यटन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. संपादित जमिनीपैकी ९ हेक्टर जमीन वगळण्यात यावी याकरिता १९९० पासून येथील ग्रामस्थ शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. अनेकदा आंदोलने करण्यात आली. परंतु शासनाकडून सकारात्मक निर्णय आजमितीस झालेला नाही.

त्यामुळे शिरोडा वेळागर येथील महिलांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे याच विषयासाठी वेळागर येथील ग्रामस्थांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्याचवेळी येथील महिलांनी शुक्रवारी वेळागर येथील खाडीपात्रात उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली.

पर्यटन प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु ९ हेक्टर जागा वगळावी आणि प्रकल्पाचे काम सुरू करावे, अशी आमची मागणी असल्याचे महिलांकडून स्पष्ट करण्यात आले. आंदोलक महिलांशी माजी आमदार राजन तेली यांनी खाडीपात्रात जाऊन चर्चा केली.

या विषयासंदर्भात पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे बैठक घेऊन भूमिका मांडणार असल्याचे श्री. तेली यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात शैलजा गवंडी, शारदा आरोस्कर, महिमा नाईक, भाग्यश्री गवंडी, वनिता आरोस्कर, रसिका आरोस्कर, प्रणाली आरोस्कर, रामचंद्र आरोस्कर यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Vidyanand Ahire: मधमाशीपालनाला प्रोत्साहनासाठी स्वतंत्र धोरण हवे

Maharashtra Ecosystem: महाराष्ट्र देशीची सृष्टी व्यवस्था व उपजीविका

Wheat Crop Pest: गहू पिकावर वाढतोय मावा किडीचा प्रादुर्भाव

Lake Restoration: तलावाधारित शाश्‍वत उपजीविकेचे आदर्श मॉडेल

Weekly Weather: किमान, कमाल तापमानात वाढ

SCROLL FOR NEXT