Land Acquisition
Land AcquisitionAgrowon

Land Acquisition : सिन्नरमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बोजे हटवा

land Compensation : सिन्नर ‘एमआयडीसी’तील उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
Published on

Nashik News : जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील इंडिया बुल्स प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आलेल्या जमिनीव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीच्या सात-बारावर कर्जाचे बोजे टाकण्यात आले होते.

हे कर्जाचे बोजे कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपर्यंत हटवून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईतील बैठकीत बुधवारी (ता. १४) दिले.

Land Acquisition
Land Acquisition : भूसंपादन मावेजासह अन्य मागण्यांसाठी ‘किसान संघ’ आक्रमक

सिन्नर ‘एमआयडीसी’तील उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Land Acquisition
Land Acquisition : रेल्वेसाठी संपादित जमिनीचा मावेजा थेट खरेदीप्रमाणे द्यावा

उद्योगमंत्री उदय सामंत व्हिसीद्वारे, तसेच आमदार माणिकराव कोकाटे, आमदार राजू कारेमोरे, नियोजन विभागचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे डॉ. अविनाश ढाकणे, नाशिकचे जिल्हाधिकारी शर्मा व्हिसीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की उद्योगांना चालना देण्यासाठी माळेगाव व मुसळगाव हा लिंक रोड लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. मुसळगाव औद्योगिक वसाहतीत पाच एकर क्षेत्रात शंभर बेडच्या हॉस्पिटलची उभारणी करण्यासाठी ‘ईएसआयसी''ला तत्काळ जागा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com