Crop Protection Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Protection : उष्णतेमुळे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी करा उपाययोजना

Water Management : सध्याच्या हवामान परिस्थितीत पिकाला पाण्याचा ताण बसू नये म्हणून ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे.

Team Agrowon

Buldana News : सध्या उष्णतामान वाढत चालले आहे. याच काळात भूजल पातळी खालावते. म्हणून शेतकऱ्यांनी पिकांना ओलीत करतेवेळी पाण्याचा अपव्यय होणार नाही अशा पद्धतीने पाणी द्यावे. पिकाला, भाजीपालावर्गीय पिकांना, फळबागांना ओलीत करताना प्राधान्याने ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

याबाबत म्हटले आहे, की पिकांना सिंचनासाठी आवश्यक तितक्याच पाण्याचा वापर करावा. कारण उन्हाळ्यात भूजल पातळी खालावलेली असते. सध्याच्या हवामान परिस्थितीत पिकाला पाण्याचा ताण बसू नये म्हणून ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे.

कोरडे हवामान, उच्च तापमान लक्षात घेता पिकाला वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते, म्हणून पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास लिंबू झाडांची वाढ कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून ठिबक सिंचनाने ४ ते ५ दिवसांच्या अंतराने लिंबू बागेला ओलीत करावे.

उष्णतामानाचा केळी बागेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून बाष्पीभवन रोखण्यासाठी केओलीन बाष्परोधक ८० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात २० ते ३० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारावे. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे परिपक्व झालेली वांग्यांची प्रत खराब होऊ शकते. म्हणून शक्यतो ताबडतोब परिपक्व वांगी काढून त्याची प्रतवारी करावी व ती वांगी बाजारपेठेत विक्रीस पाठवण्याची व्यवस्था करावी.

उन्हाळ्यातील ३७.० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असलेले कमाल तापमान व कमी झालेली आर्द्रता पेरू फळबागेतील फळधारणा योग्य रितीने होण्यास बाधक ठरते व त्यामुळे फळगळ होऊन एकंदरीत उत्पादनात घट येऊ शकते.

म्हणून उच्च तापमानापासून संरक्षण म्हणून फळबागेत सेंद्रिय आच्छादनांचा वापर करावा. सध्याच्या वाढत्या तापमानाची कक्षा लक्षात घेऊन कांदा पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतेवेळी ते प्राधान्याने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करावे, असेही म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT