Crop Protection: पेरू बागेला साड्यांचे आच्छादन; स्मार्ट शेतीचा नवा फंडा!

Agriculture Innovation: उष्णतेच्या तीव्रतेचा फटका शेतीला बसत असताना, इंदापूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी केशव बोडके यांनी पेरूच्या बागांना उन्हापासून वाचवण्यासाठी रंगीबेरंगी साड्यांचे आच्छादन केले आहे. या नव्या प्रयोगाची परिसरात मोठी चर्चा होत आहे.
Guava Farming
Guava FarmingAgrowon
Published on
Updated on

Indapur News: सध्या उष्णतेचा पारा हळूहळू वाढू लागला आहे. त्याचा फटका फळपिकांसह भाजीपाल्याला बसू लागला आहे. जिवापाड जपलेल्या पिकांना सांभाळण्याकरिता शेतकरी धडपडताना दिसत आहे. पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील प्रगतिशील शेतकरी केशव बोडके यांनी पेरूच्या बागेला कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रंगीबेरंगी साड्यांचे आच्छादन केले आहे.

Guava Farming
Guava Processing : वाया जाणाऱ्या पेरुवर करा प्रक्रिया आणि नुकसान कमी करा

फेब्रुवारी महिन्यापासूनच कडक ऊन पडत आहे. इंदापूर तालुक्यात पिके उन्हामुळे सुकू लागली आहेत. फळ पिकांबरोबरच चारा पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.

Guava Farming
Agricultural Innovation : भरडधान्य, रानभाज्यांची मूल्यसाखळी विकसित करणे गरजेचे : डॉ. जाधव

या उन्हापासून बचावासाठी श्री. बोडके यांनी पेरूच्या झाडांवर रंगीबेरंगी साड्यांचे आच्छादन केले आहे. या साड्याच्या आच्छादनाची परिसरात मोठी चर्चा आहे. तसेच आतील बाजूस फोम व प्लॅस्टिक पिशव्या असे तिहेरी आच्छादन वापरून फळबागेला उन्हापासून वाचवायचा प्रयत्न केला गेला आहे.

पिकांचे रोगराईपासून संरक्षण व्हावे तसेच कडक उन्हापासून जपण्यासाठी रंगीबेरंगी साड्यांचे आच्छादन वापरण्यात आले आहे. यासाठी एकरी ३०० ते ३५० साड्यांचा वापर केला आहे. त्यामुळे निर्यातीच्या दर्जाच्या पेरूचे उत्पादन घेता येईल.
केशव बोडके, प्रगतिशील शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com