Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : ताटकळत ठेवलेल्या उपसंचालकांना बढती

Latest Agriculture News : राज्यातील कृषी उपसंचालकांना बढती देत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर (एसएओ) नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर अखेर नऊ महिन्यानंतर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : राज्यातील कृषी उपसंचालकांना बढती देत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर (एसएओ) नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर अखेर नऊ महिन्यानंतर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १९ उपसंचालकांना बढती देण्यात आली आहे.

राज्यात ‘एसएओ’ पदाच्या २४ जागा रिक्त होत्या. यात नागपूर १, अमरावती १, छत्रपती संभाजीनगर ४, नाशिक ३, कोकण २ तर पुणे विभागात १३ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी अडवणूक होणार नाही, अशी भूमिका कृषिमंत्री धनंजय मुंडे व अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांनी घेतली होती. परंतु, नेमक्या कोणत्या कारणांमध्ये अनेक महिने बढतीने नियुक्तीचा प्रस्ताव रखडला या विषयी राज्यभर सतत चर्चा चालू होती.

“कृषी आयुक्तालयाने रिक्त जागांवर नियुक्तीबाबत अधिकाऱ्यांच्या प्रस्तावांची वेळेत छाननी केली होती. ‘खात्यांतर्गत पदोन्नती समिती’कडे (डीपीसी) प्रस्ताव गेले होते. समितीनेदेखील प्रस्तावांवर शिक्कामोर्तब केले व सामान्य प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवले होते.

या प्रक्रियेत काही महिने गेले. बढती दिल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीच्या विभागांचे विकल्प मागविण्यात आले. विकल्प मागवून नियुक्तीचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवले होते. परंतु, तेथे आणखी दिरंगाई झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सेवाज्येष्ठतेचा हक्क नाही

कृषी खात्याच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांनी पहिल्या टप्प्यात २१ पैकी १९ अधिकाऱ्यांच्या बढतीवरील नियुक्त्यांचे शासन निर्णय गुरुवारी (ता. ८) सायंकाळी जारी केले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ही पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाची असल्यामुळे सेवाज्येष्ठतेचा हक्क सांगता येणार नाही, अशी अट टाकण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी या अधिकाऱ्यांची सुरू झालेली नसल्याचे गृहीत धरुन पदोन्नती दिली जात असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात सध्याची पदे)

अजय कुलकर्णी (उपसंचालक, खते विभाग, कृषी आयुक्तालय) - कोल्हापूर जेडीए कार्यालय, कुरबान मुराद तडवी (एसएओ कार्यालय,धुळे) - एसएओ, जळगाव, विठ्ठल कर्डिले (उपसंचालक, कृषी गणना, कृषी आयुक्तालय), मुख्य सांख्यिक, पुणे, गोविंद मोरे (उपसंचालक, दक्षता पथका, कृषी आयुक्तालय), एसएओ दक्षता पथक, ज्ञानेश्वर तसरे (उपविभागीय कृषी अधिकारी, उमरेड, नागपूर), स्मार्ट, पुणे, दीपक पटेल (समन्वय अधिकारी, उपसंचालक कृषी व्यवसाय,

आत्मा, बुलडाणा)- आत्मा, नंदूरबार, अंबादास मिसाळ (उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर, बुलडाणा) - सहसंचालक, दक्षता विभाग, बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला, सुबोध मोहरील, ( उपसंचालक, वसंतराव नाईक कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर) - उपायुक्त, मनरेगा, नागपूर, कैलास शिरसाट (जिल्हा कृषी विकास अधिकारी, नाशिक) - एसएओ, धुळे,

गोकूळ वाघ ( उपविभागीय कृषी अधिकारी, नाशिक) - आत्मा, नगर, वंदना शिंदे ( प्रकल्प उपसंचालक, आत्मा, नाशिक) - आत्मा, रायगड, श्रीपाद खळीकर ( सहसंचालक, विस्तार विभाग, दिल्ली ) - स्मार्ट, पुणे, प्रियांका भोसले (उपसंचालक, एसएओ कार्यालय, सांगली), स्मार्ट, पुणे, दत्तात्रेय दिवटे (उपसंचालक, एसएओ कार्यालय, छत्रपती संभाजीनगर) -

रोहयो, ठाणे, माधुरी सोनवणे (प्रकल्प उपसंचालक, आत्मा, नांदेड)- जेडीए कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, अश्विनी भोपळे (उपसंचालक, विस्तार व प्रशिक्षण) - आत्मा, पुणे, खंडेराव सराफ (उपसंचालक, फलोत्पादन विभाग, कृषी आयुक्तालय) - आत्मा, धाराशिव, रक्षा शिंदे (विभागीय सांख्यिक, जेडीए कार्यालय, लातूर) - स्मार्ट, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT