MPSC Agriculture Department : कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा सरकारने दोन दिवसांत निर्णय फिरवला

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयात कृषी अधिकारी पदासंदर्भात याचिका दाखल असून, न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन ही नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
MPSC Agriculture Department
MPSC Agriculture Departmentagrowon
Published on
Updated on

Agricultural Officer Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी अधिकारी या पदावर शिफारस केलेल्या १२१ उमेदवारांच्या नियुत्तीचे आदेश अवघ्या दोन दिवसांत राज्य सरकारने रद्द केले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात कृषी अधिकारी पदासंदर्भात याचिका दाखल असून, न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन ही नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागात कृषी सेवा गट 'ब' (कनिष्ठ) या संवर्गातील कृषी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांसंदर्भात नुकत्याच झालेल्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता. १) उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला होता, परंतु प्रशासकीय कारणास्तव हा आदेश रद्द करण्यात येत आहे, असे परिपत्रक सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC Agriculture Department
Farmers Production Scheme : शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे प्रशिक्षण, आर्थीक उन्नतीसाठी नवीन योजना

वडेट्टीवार यांनी काय केली होती मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मधून एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून करण्यात आली आहे. या उमेदवारांना मागील ७ महिन्यापासून नियुक्ती न दिल्याने ते दोन दिवसापासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत, या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली होती.

कृषी उपसंचालक (वर्ग १) १९, तालुका कृषी अधिकारी (वर्ग २)-६१, मंडळ कृषी अधिकारी (वर्ग २)-१२२ अशा एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून करण्यात आली आहे. यासर्व उमेदवारांची कागदपत्रे दिनांक १७ व १८ ऑगस्ट, २०२३ रोजी तपासून पूर्ण झालेली असूनही मागील ७ महिन्यापासून यांच्या नियुक्तीची प्रक्रिया कृषी विभागाकडून अजूनही पूर्ण झालेली नाही. यामुळे या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com