Agriculture Department : ‘कृषी’तील मुदतपूर्व बदल्यांना अखेर मंजुरी

Transfer of Agriculture Employees : राज्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यास सात महिन्यानंतर मान्यता दिली आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Pune News : राज्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यास सात महिन्यानंतर मान्यता दिली आहे. बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कृषी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सध्याच्या जबाबदारीतून तत्काळ मुक्त करावे, असे आदेश शासनाने दिले आहेत.

कृषी मंत्रालयाचे कक्ष अधिकारी रोहिदास खोकले यांनी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना पाठवलेल्या शासन आदेशानुसार, कृषी अधिकारी गट -ब (कनिष्ठ) मधील मुदतपूर्व बदल्यांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याचे नमूद केले आहे.

मुदतपूर्व व विनंतीने बदली झालेले कृषी अधिकारी (कंसात बदलीचे ठिकाण) नूतन लांडगे, मंडळ अधिकारी, बोदवड (कृषी अधिकारी, पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय), प्रियांका वालकर, कृषी अधिकारी, नांदेड एसएओ कार्यालय (मानोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वाशीम), प्रमिला जंजिरे, मंडल अधिकारी, पानगाव, ता.रेणापूर, जि. वाशीम (कोळेगाव मंडळ कृषी अधिकारी, श्रीगोंदा, जि. नगर),

अशोक वाळके, फत्तेपूर मंडळ अधिकारी, ता. जामनेर (अकोळनेर मंडळ अधिकारी, नगर), भक्ती यादव कोतुळक मंडळ कृषी अधिकारी (कृषी अधिकारी, जेडीए, पुणे), राहुल अडके, ताम्हाणे, ता. चिपळूण (कीटकनाशक चाचणी परीक्षण प्रयोगशाळा, पुणे), मयूर कचरे, मंडळ अधिकारी, अमळनेर (पिर्सवे मंडळ अधिकारी, ता. पुरंदर), राजेंद्र टोणे, हानेगाव मंडळ कृषी अधिकारी,

Agriculture Department
Agriculture Training : कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती प्रशिक्षण

ता, देगलूर (जत तालुका कृषी अधिकारी, सांगली), रेणुका गायकवाड, न्हावा, ता. शिरूर, जि. पुणे (कृषी अधिकारी, पुणे खत चाचणी परीक्षण प्रयोगशाळा), सचिन फुले, कृषी अधिकारी, वाई (कृषी अधिकारी, गुणनियंत्रण कक्ष, एसएओ कार्यालय, ठाणे), संदीप पवार, कृषी अधिकारी, आक्राणी, जि.नंदूरबार (कृषी अधिकारी, गुणनियंत्रण कक्ष, जेडीए कार्यालय, नागपूर), सोपान डोखे, मंडळ अधिकारी, नामपूर, ता. सटाणा (कृषी अधिकारी, सिन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालय), राजेंद्र डोंबाळे (कृषी अधिकारी, नसरापूर, ता. भोर (कृषी अधिकारी, बारामती उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय),

शहाजी शिंदे, कृषी अधिकारी, वाई तालुका कृषी अधिकारी कार्यालय (मंडळ अधिकारी, विडणी, ता. फलटण), रंजना देशमुख, मंडळ अधिकारी, गडहिंग्लज (मंडळ अधिकारी, अडसूळ, ता. तेल्हारा), रमेश देशमुख, मंडळ अधिकारी, सारवाडी, कारंजा गाडगे, जि. वर्धा (मंडळ अधिकारी, शेलापूर, जि. बुलडाणा), रूपाली इंगळे, मंडळ अधिकारी, पाथरोट, ता. अचलपूर (कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पांढरकवडा), राजेश पवार, मंडळ अधिकारी, दासगाव, ता. गोंदिया (मंडळ अधिकारी, मलकापूर),

नीलेश अडसुळे, मंडळ अधिकारी, ताडकळस, ता. पूर्णा, जि. परभणी (मंडळ अधिकारी, शिराळा, जि. सांगली), पल्लवी घाडगे (मंडळ अधिकारी, ब्राम्हणवाडा थडी, ता. चांदूरबाजार, अमरावती (मंडळ अधिकारी, वाघोली, पुणे), किसन बोथीकर, मंडळ अधिकारी, मालेगाव, जि. वाशीम (मंडळ अधिकारी, डोंगरकडा, ता. कळमनुरी, हिंगोली), संजय इरकर, मंडळ अधिकारी, मालेगाव, वाशीम (मंडळ अधिकारी, बेलकुंड, ता. औसा, लातूर),

सचिन जाधव, कृषी अधिकारी, स्मार्ट, जि. बीड (मंडळ अधिकारी, तुंगत, ता. पंढरपूर), स्नेहल धायगुडे, मंडळ अधिकारी, कुंभार पिंपळगाव, ता. घनसांगवी, जालना (कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पुरंदर), चंद्रकांत धायगुडे, कृषी अधिकारी, पुरंदर (मंडळ कृषी अधिकारी, जेजुरी), वृषाली पाटील, मंडळ अधिकारी, पुरंदर ( मंडळ अधिकारी, खेड, ता. राजगुरुनगर),

Agriculture Department
Agriculture Department : कृषी संचालकांचा मुदतपूर्व निवृत्तीचा अर्ज फेटाळला

प्रमोद गावडे, मंडळ अधिकारी, नेवासा (मंडळ अधिकारी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी), राजश्री ऋषीपुरी, मंडळ अधिकारी, राणीउंचेगाव, ता. घनसांगवी, जालना (कृषी अधिकारी, जेडीए कार्यालय, नागपूर), मोनाली रेडे, कृषी अधिकारी, खत चाचणी प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर (कृषी अधिकारी, कृषी

आयुक्तालय, मृद्संधारण, पोकरा प्रकल्प, पुणे), मनोज सूर्यवंशी, मंडळ अधिकारी, सालबतपूर, ता. नेवासा (मंडळ अधिकारी, श्रीगोंदा), रामदास भिसे, मंडळ अधिकारी, भोकरदन, जालना (तालुका कृषी अधिकारी कार्यालय, हदगाव, जि. नांदेड), ज्योतिबा पवार, मंडळ अधिकारी, बिलोली, नांदेड (कृषी अधिकारी, मुदखेड, नांदेड),

चंद्रकांत टिळक, मंडळ अधिकारी, नेर, यवतमाळ (कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, रेणापूर), शरद पवार, मंडळ अधिकारी, किनगाव, अहमदपूर, लातूर (कृषी अधिकारी, फळरोपवाटिका, पैठण), विजयकुमार वाघमारे (मंडळ अधिकारी, रत्नागिरी (मंडळ अधिकारी, पानगाव, ता. रेणापूर),

किशोर मामीडवार, कृषी अधिकारी, कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर (मंडळ अधिकारी, इस्लापूर, ता. किनवट, नांदेड), संदीप संखे, मंडळ अधिकारी, अकोला (मंडळ अधिकारी, पालघर), रवींद्रकुमार चाटे, मंडळ अधिकारी, छत्रपती संभाजीनगर (कृषी अधिकारी, जेडीए कार्यालय, लातूर), संजय मोहिते, मंडळ अधिकारी, पाचोरा (कृषी अधिकारी, जेडीए कार्यालय, नाशिक),

सोनाली सोनावणे, कृषी अधिकारी, अमळनेर (मंडळ अधिकारी, हिंगणा), माधवी घोरपडे, मंडळ अधिकारी, चाळीसगाव (मंडळ अधिकारी, जेऊर, नगर), संजय चव्हाण, कृषी अधिकारी, यवतमाळ ( तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव), नरेंद्र पाडवी, कृषी अधिकारी, नंदूरबार (मंडळ अधिकारी, धडगाव).

कुटुंबातील आजारपणाच्या कारणास्तव बदल्या

संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या कुटुंबातील आजारपणाच्या कारणास्तव झालेल्या आहेत. बहुतेक अधिकाऱ्यांनी आपली आई आजारी असल्याचे नमूद केले आहे. काही प्रस्तावांमध्ये वडील, सासरे यांच्याही आजारपणाचा उल्लेख आहे. काही बदल्या पती-पत्नी एकत्रीकरण, इतर कौटुंबिक समस्यांमुळे करण्यात आलेल्या आहेत, असे आस्थापना विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com