Dairy Business  Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : संघर्षातून साधली दुग्ध व्यवसायात प्रगती

Diwali Article 2024 : पावसावर आधारित शेती... आर्थिक स्थितीही हलाख्याची...अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत वाघजाळी (जि. हिंगोली) येथील श्यामराव, रुस्तुमराव आणि रामेश्‍वर या तांबिले बंधूंनी नवी वाट शोधली.

माणिक रासवे

Dairy Business Management : हिंगोली जिल्ह्यात डोंगराळ, अवर्षणप्रवण असलेल्या सेनगाव तालुक्यात वाघजाळी गाव आहे. सुमारे अडीच हजारांच्या आसपास गावचे क्षेत्र असून शेती व पूरक व्यवसायावरच गावाचे अर्थकारण अवलंबून आहे. रोजगाराच्या संधी तशा खूप कमी. गावशिवारात माळरानाची, हलकी, जमीन अधिक आहे.

केवळ पावसावर आधारित असलेली शेती परवडत नसल्याने गावातील शेतकरी दुग्ध, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसायात उतरले. तब्बल दोन दशकांपासून दुग्ध व्यवसायात चिकाटीने तग धरुन असलेले तांबिले बंधू त्यापैकीच एक. त्यांच्या यशकथेचा प्रवास संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायीदेखील आहे.

वाट्याला आलेला संघर्ष

आपल्या आजवरच्या प्रगतीबाबत रुस्तुमराव आणि रामेश्‍वर या तांबिले बंधूंना सार्थ अभिमान आहे. थोरले श्यामराव आणि त्यांच्या पाठचे हे दोघे बंधू आहेत. हलाखीच्या परिस्थितीमुळे जेमतेम पाचवी- सहावीनंतर शाळा सोडून त्यांनी शेतीची वाट धरली. अगदी कमी वयात शेतात कष्ट करण्याची सवय अंगवळणी पडली. वडील विक्रमजी यांची अठरा एकर शेती होती. पण ती बहुतांशी पावसावरच आधारित होती.

चार एकरांतच धान्य व्हायचे. चौदा एकरांवरची मेहनत बऱ्याचदा वाया जायची. पण तांबिले बंधू कधीच निराश झाले नाहीत. विहिरीला पुरेसे पाणी असे त्या वेळी थोडी ऊस लागवड व्हायची. गुऱ्हाळावर गूळ तयार करून त्याची विक्री ते करीत. पुढे ते परवडेनासे झाल्याने गुऱ्हाळ बंद केले. दुष्काळाशी गाठ नित्याचीच झाली असल्याने बाराही महिने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता भेडसावायची. तरुण श्यामराव आणि रुस्तुमराव यांनी मग गावात शेतमजुरी सुरू केली. त्याचा कुटुंबाला मोठा आधार होऊ लागला.

दुग्ध व्यवसायाची दिशा मिळाली

सन १९८५ च्या सुमारास घरच्या दोन देशी गायी होत्या. घरच्या पुरते दूध मिळे. हेच दूध पिऊन गोऱ्हे देखील अंगापिंडाने धष्टपुष्ट होत. तांबिले बंधू त्यांची शेतीकामांसाठी विक्री करू लागले. सोबत कालवडींचा सांभाळ करू लागले. हळूहळू गाईंची संख्या वीसपर्यंत पोहोचली. शेतकऱ्यांकडून वासरे खरेदी करून, ती मोठे करून तोही विक्री व्यवसाय सुरू केला. वर्षभरात चार-पाच गोऱ्हे विकायला येत.

तो स्वस्ताईचा काळ होता. घरच्या पशुधनाची चाऱ्याची गरज भागून शिल्लक गवत व गोऱ्हे विकून वर्षाकाठी वीस-तीस हजार रुपये हाती पडत. तेव्हा त्याचे मोल खूप होते. गावात त्या वेळी तीन एकर जमीन विक्रीस निघाली होती. चाळीस हजार रुपये एकरांप्रमाणे सौदा ठरला. पण समोरच्यास एकगठ्ठा रक्कम हवी होती. मग काही गोऱ्हयांची विक्री केली. दोघा भावांच्या मजुरीतील काही आणि शेतीमाल विक्रीतील काही अशी लाखाच्या रकमेची जुळवाजुळव केली. त्यातून जमीन आपल्या मालकीची करून घेतली. तिथून दुग्धव्यवसाय पुढे नेण्याची दिशा मिळाली.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT