Urea  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Management : एकात्मिक खत व्यवस्थापनातून उत्पादनवाढ

डॉ. प्रीती देशमुख, जे. पी. खराडे 

भाग ः २

महाराष्ट्रातील ऊस लागवडीखालील जमिनीतील गंधकाची कमतरता लक्षात घेता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शाश्वत उत्पादकतेसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करण्याची शिफारस केली आहे.

जिवाणू खते

जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता शाश्वत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थ जमिनीतील जीवाणूंचे खाद्य आहेत. जमिनीत सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यास जिवाणू अधिक कार्यक्षम होतात. हे जिवाणू जमिनीतील पिकांच्या उरलेल्या अवशेषांचे विघटन करतात.

तसेच दिलेल्या रासायनिक खतांची उपलब्धता करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. त्यामुळे ऊस पिकाची वाढ होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते. आडसाली हंगामासाठी ऊस वाढीच्या अवस्थेप्रमाणे सेंद्रिय, रासायनिक, आणि जैविक अन्नद्रव्याचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास ऊस व साखर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे गुणधर्मही सुधारण्यास मदत होते. पिकाच्या वाढीसाठी मुख्य, दुय्यम अन्नद्रव्यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते. याकरिता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटद्वारे मल्टिमायक्रोन्यूट्रियंट द्रवरूप खत तयार केले आहे. यामुळे ऊस उत्पादनात एकरी ६ ते ८ टनांपर्यंत वाढ मिळाल्याचे दिसून आले आहे.

द्रवरूप खत वापराचे वेळापत्रक

व्हीएसआय निर्मित मल्टिमायक्रोन्यूट्रियंट आणि मल्टिमॅक्रोन्यूट्रियंट या द्रवरूप खताची पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी प्रत्येकी ५ लिटर प्रमाणे प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात एकत्रित करावी. किंवा

लागणीनंतर ६० दिवसांनी मल्टिमॅक्रोन्युट्रियंट (१५:१५:१५) खताची मात्रा ३.७५ किलो अधिक मल्टिमायक्रोन्युट्रियंट ५ लिटर प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून पानांवर फवारणी करावी. आणि मल्टिमायक्रोन्युट्रीयंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रीयंट या द्रवरूप खताची प्रत्येकी ७.५ लिटर प्रति ७५० लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी ९० दिवसांनी करावी. किंवा लागणीनंतर ९० दिवसांनी मल्टिमॅक्रोन्युट्रियंट (१५:१५:१५) ५ किलो अधिक ७.५ लिटर मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति हेक्टरी ७५० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून पानावर फवारणी केल्यास उत्पादनात एकरी ६ ते ८ टनांनी वाढ मिळते.

व्हीएसआय मायक्रोसोल हेक्टरी २५ किलो प्रमाणे मात्रा द्यावी. सदर विद्राव्य खत दोन पद्धतीने देता येते. हे खत सेंद्रिय आम्लयुक्त असून पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असल्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे आणि जमिनीत देण्यास उपयुक्त आहे. ठिबक संचाद्वारे प्रत्येक वेळी हेक्टरी ६.५ किलो ३०० लिटर पाण्यात विरघळवून लागणीचे वेळी, लागणीनंतर ६० दिवसांनी, १२० दिवसांनी आणि १८० दिवसांनी असे चार वेळा सोडावे. किंवा ठिबक संच नसल्यास शेणखतात किंवा कंपोस्ट खतात मिसळून लागणीचे वेळी हेक्टरी १२.५ किलो आणि ऊस बांधणीचे वेळी १२.५ किलो या प्रमाणात जमिनीत चळी घेऊन द्यावे.

व्हीएसआय निर्मित ह्युमिक अ‍ॅसिड या खताची प्रत्येक वेळी हेक्टरी २.५ लिटर प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून लागणीचे वेळी आणि मोठ्या बांधणीचे वेळी ठिबक संचाद्वारे द्यावे. किंवा ठिबक संच नसल्यास लागणीचे वेळी आणि मोठ्या बांधणीचे वेळी हेक्टरी २.५ लिटर प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून आळवणीद्वारे सोडावे.

ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर

विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खतांची उपयुक्तता वाढते. तसेच शिफारशीत खत मात्रेमध्ये ४० टक्के बचत होऊ शकते. ठिबक सिंचनाद्वारे खते मुळांच्या सानिध्यात दिल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते. आडसाली हंगामासाठी ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर करण्याचे वेळापत्रक खाली दिलेले आहे.

ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याचे वेळापत्रक

खते देण्याच्या वेळा युरिया (किलो/हेक्टर) फॉस्फोरिक अ‍ॅसिड (कि/हे) म्युरेट ऑफ पोटॅश (कि/हे) खते देण्याच्या वेळा युरिया

(कि /हे) फॉस्फोरिक अ‍ॅसिड (कि/हे) म्युरेट ऑफ पोटॅश (कि/हे)

लागणीचे वेळी ५ २ २ २० आठवड्यांनी ४७ १५ ९

२ आठवड्यांनी १० ३ ३ २२ आठवड्यांनी ५२७ १७ १४

४ आठवड्यांनी १० ३ ३ २४ आठवड्यांनी ४७ १५ १५

६ आठवड्यांनी २१ ७ ३ २६ आठवड्यांनी ३१ १० १४

८ आठवड्यांनी ३१ १० ५ २८ आठवड्यांनी २१ ७ १२

१० आठवड्यांनी ३१ १० ७ ३० आठवड्यांनी १६ ५ १२

१२ आठवड्यांनी ४२ १३ ८ ३२ आठवड्यांनी १० ३ १२

१४ आठवड्यांनी ४२ १३ १० ३४ आठवड्यांनी १० ३ १०

१६ आठवड्यांनी ४२ १३ १२ ३६ आठवड्यांनी ५ २ १०

१८ आठवड्यांनी ४७ १५ ९ एकूण ५२१ १६७ १६९

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

माती परिक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास ऊस लागणीचे वेळी देण्यात येणाऱ्या खतांच्या मात्रा खालील तक्त्यात दिलेल्या आहेत.

सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते खताचे प्रमाण (टक्के) खत मात्रा(किलो प्रति हेक्टर)

लोह फेरस सल्फेट १९ २५

मंगल मॅंगेनीज सल्फेट २६ १०

जस्त झिंक सल्फेट २३.३ २०

तांबे कॉपर सल्फेट २४ १२.५

बोरॉन बोरॅक्स ११ ५

मॉलिब्डेनम अमोनिअम मॉलीब्डेट ५४ २.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT