Crop Fertilizer Management : पीक वाढीच्या अवस्थेनुसार वरखतांचा वापर महत्त्वाचा

Kharif Crop Management : बहुतांश पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत नत्राची, फुले येण्याच्या काळात नत्राची व स्फुरदाची, तर शेंगा येण्याच्या काळात नत्राची व पालाशची आवश्यकता असते.
Crop Fertilizer Management
Crop Fertilizer ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे

Kharif Crop : बहुतांश पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत नत्राची, फुले येण्याच्या काळात नत्राची व स्फुरदाची, तर शेंगा येण्याच्या काळात नत्राची व पालाशची आवश्यकता असते. ही मात्रा जमिनीतून किंवा फवारणीच्या माध्यमातून दिल्यास पिकाची गरज भागवली जाते. याशिवाय पीक उत्पादनात वाढ होते. म्हणून पिकांची आंतरमशागत झाल्यावर वरखतांची विशेषतः उर्वरित नत्राची मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी पिकाच्या संवेदनशील अवस्था, कायिक वाढ आणि वाढीनुसार अन्नद्रव्यांची व विद्राव्य खतांची निवड ही क्रमप्राप्त ठरते.


कापूस ः
- कापूस पिकास शिफारशीपेक्षा अधिक प्रमाणात नत्राचा वापर टाळावा.
- कोरडवाहू बी.टी. कपाशी पिकास पेरणीनंतर ३० दिवसांनी व ६० दिवसांनी नत्राची उर्वरित ४० टक्के मात्रा म्हणजेच २.५ गोण्या युरिया प्रति हेक्टरी द्यावी.
- बागायती बी.टी. कपाशीस पेरणीनंतर ३० दिवसांनी व ६० दिवसांनी उर्वरित नत्राची ४० टक्के मात्रा, म्हणजेच दोन गोण्या युरिया प्रति हेक्टरी द्यावी.
- पीक फुलोऱ्यात असताना ४५ व ६५ दिवसांनी २ टक्के युरिया किंवा १९:१९:१९ या विद्राव्य खताची ०.५ टक्का (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी किंवा फुलोरा अवस्थेत ०:५२:३४ ची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- बोंडे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा पाती, फुले व बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत १ टक्का पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) याची (१० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी.
- पाते, फुले व बोंडे गळ कमी कमी करण्यासाठी एनएए (नॅप्थालिक ॲसिटिक ॲसिड) ३ ते ४ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शिफारस मात्रेसोबत फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया (२०० ग्रॅम युरिया प्रति १० लिटर पाणी), बोंडे परिपक्व होताना युरिया १ टक्का (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) अधिक मॅग्नेशिअम सल्फेट (०.२ टक्का) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- पीक साधारण ५ फूट उंचीचे झाल्यावर (९० ते १०० दिवसांनी) शेंडा खुडणी करावी.

Crop Fertilizer Management
Kharif Crop: पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार करा खत व्यवस्थापन

सोयाबीन ः
- पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी पीक पिवळे पडल्यास, जमिनीतून झिंक सल्फेट २५ किलो आणि बोरॅक्स १० किलो प्रति हेक्टरी द्यावे. किंवा फुले मायक्रो ग्रेड-२ ची ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.
- मिश्र खतांच्या माध्यमातून शिफारशीत खते दिली असल्यास १० ते २५ किलो गंधकाचा वापर करावा.
- पावसाचा खंड पडल्यास, पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) १०० ग्रॅम प्रमाणे पहिली फवारणी ३५ व्या दिवशी, दुसरी फवारणी ५५ व्या दिवशी पोटॅशिअम नायट्रेट (२ टक्के) २०० ग्रॅम प्रमाणे प्रति १० लिटर पाण्यातून करावी.
- फुलोरा येण्याच्या १० दिवस आधी १२:६१:० (१ टक्का) १०० ग्रॅम प्रमाणे १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- अधिक उत्पादनासाठी ५० ते ७० दिवसांनी, युरिया (२ टक्के) २०० ग्रॅम किंवा १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी २०० ग्रॅम, तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ (२ टक्के) २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास फेरस सल्फेट ५० ग्रॅम अधिक कळीचा चुना २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पीक फुलावर येण्यापूर्वी व शेंगा भरण्याच्या अवस्थेत फवारणी करावी.

मका ः

- पेरणीनंतर ३० दिवसांनी व ४५ दिवसांनी नत्र खताची प्रत्येकी ४० किलो मात्रा (दोन गोण्या युरिया प्रति हेक्टरी) प्रमाणे द्यावे.
- सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास पीक ३० ते ३५ दिवसांचे असताना फुले मायक्रो ग्रेड -२ (५० मिलि, १० लिटर पाणी) फवारणी करावी.
अधिक उत्पादनवाढीसाठी पीक वाढीच्या अवस्थेत १९ :१९: १९ या विद्राव्य (५ ग्रॅम, १० लिटर पाणी) खताची पीक ३५ ते ४५ दिवसांचे असताना फवारणी करावी.

भुईमूग ः
- आऱ्या सुटताना २०० किलो जिप्सम प्रति हेक्टरी द्यावे.
- शिफारशीपेक्षा अधिक प्रमाणात नत्राचा वापर टाळावा.

तूर ः
- पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना, १९:१९:१९ या खताची (१ ते २ टक्के) याप्रमाणे फवारणी करावी.
- पाणी देण्याची सोय नसेल तर फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया २०० ग्रॅम किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) २०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मूग, उडीद, कुळीथ, मटकी, चवळी ः
- खतांच्या सर्व मात्रा पेरणीच्या वेळी द्याव्यात.
- शेंगा भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ २ टक्के (२०० ग्रॅम, १० लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी.

बाजरी ः
- पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी उर्वरित ५० टक्के नत्राची मात्रा जमिनीत ओल असताना द्यावी.
- हलक्या जमिनीस २० नत्र किलो (एक गोणी युरिया), तर मध्यम जमिनीस २५ किलो नत्र (५५ किलो युरिया) प्रति हेक्टरी द्यावा.

खरीप ज्वारी
- पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी नत्राची उर्वरित अर्धी मात्रा (५० किलो नत्र) (दोन गोण्या युरिया) द्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com