Sugar Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : सातारा जिल्ह्यात दीड कोटी टन साखरेची निर्मिती

Team Agrowon

Satara News : पाणीटंचाईमुळे उसाचे क्षेत्र कमी झाले असतानाही जिल्ह्यात साखर निर्मितीत कारखान्यांनी कोटीची उड्डाणे घेतली आहेत. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी एक कोटी १५ लाख नऊ हजार २६८ टन ऊस गाळपाद्वारे एक कोटी ५३ लाख सात हजार ९९८ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सहा कारखान्यांची हंगाम सांगता झाली असून, अद्याप ११ कारखान्यांचे गाळप सुरू आहे.

ऊसगाळप हंगाम सुरू झाल्यापासून ऊस क्षेत्र कमी असल्याने गाळप हंगाम लवकरच संपेल व तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यामुळे प्रमुख सर्व कारखान्यांनी कार्यक्षेत्रासह मिळेल तेथून ऊस आणण्यास प्राधान्य दिले जात होते. गत वर्षीच्या तुलनेत या हंगामात गाळप करणाऱ्या संख्येत तीन कारख्यान्यांची भर पडली आहे.

जिल्ह्यातील एकूण १७ कारखान्यांनी एक कोटी १५ लाख नऊ हजार २६८ टन ऊस गाळपाद्वारे एक कोटी ५३ लाख सात हजार ९९८ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. ऊसगाळपात व साखर निर्मिती जरंडेश्वर शुगर, तर साखर उताऱ्यात अजिंक्यतारा सहकारी कारखान्याने आघाडी घेतली आहे. खासगी कारखान्यांनी एकूण ५३ लाख ३८ हजार ८६७ टन उसाचे गाळप करून ५० लाख ११ हजार ४८ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

त्यांना सरासरी ९.३९ टक्के साखर उतारा मिळाला आहे, तर सहकारी साखर कारखान्यांनी ४८ लाख २० हजार ४०१ टन उसाचे गाळप करून ५५ लाख २६ हजार ९५० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यांना ११.४४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. साखर उताऱ्यात या वेळेस अजिंक्यतारा साखर कारखान्याने आघाडी घेत १२.३३ टक्के साखर उतारा मिळाला आहे, तर त्यापाठोपाठ सह्याद्री कारखान्याला १२.१८ टक्के उतारा मिळाला आहे,

तर सर्वाधिक १८ लाख ६० हजार २०० टन ऊस गाळपाद्वारे १६ लाख ३४ हजार ४०० क्विंटल साखरेची निर्मिती करून जरंडेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. दरम्यान, किसन वीर, खंडाळा कारखाना, बाळासाहेब देसाई, अथनी-रयत, प्रतापगड, शरयू ॲग्रो या चार कारखान्यांनी आपले गाळप उरकले आहे. शिल्लक उसाचे क्षेत्र बघता मार्चअखेर बहुतांश कारखान्यांचा हंगामाची सांगता होणार आहे.

कारखानानिहाय गाळप व कंसात साखर निर्मिती (क्विंटलमध्ये)

सहकारी कारखाने : जवाहर श्रीराम कारखाना ४,८५,६५२ ( ५,४९,८५०), कृष्णा कारखाना १३,२०,५६० (१४,६७,६२०) किसन वीर कारखाना ४,५२,७५९ (५,२१,०४०), देसाई कारखाना २,२४,४१४ (२,६८,७७५), सह्याद्री कारखाना ९,१२,२०० (१०,७४,८००), अजिंक्यतारा कारखाना ६,६५,२३० (७,९३,२६०) रयत-अथणी ३,६०,९९० (३,९६,५८०), प्रतापगड कारखाना ३,०१,०५१ (३,४७,३००) खंडाळा कारखाना १,०४,५४६ (१,०७, ७२५)

खासगी कारखाने : दत्त इंडिया फलटण ८,२३,२२५ (७,३८,१५०), जरंडेश्वर शुगर १८,६०,२०० (१६,३४,४००), जयवंत शुगर ७,०४,९९५ (७,८४,९००), ग्रीन पॉवर शुगर खटाव ३,१७,११० (३,५१,२५०), स्वराज्य ग्रीन पॉवर ४,५०,६१६ (३,७३,५१८), शरयू ॲग्रो ४,१३,७९४ (३,३२,४८०), खटाव- माण ॲग्रो पडळ ६,०८,४५० (६,५३,१५०), शिवनेरी शुगर कोरेगाव १,६०,४७७ ( १,४३,२००). (आकडेवारी १७ मार्चच्या साखर आयुक्तांच्या अहवालानुसार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT