Rohit Pawar
Rohit PawarAgrowon

Rohit Pawar : रोहित पवार यांच्या कारखाना मालमत्तेवर ईडीची कारवाई; रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया...

Baramati Agro Raid News : आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’ कंपनीशी संबंधित कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने ५० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे.
Published on

Pune News : ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’चे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली. ईडीने ५० कोटी २० लाख रुपये किंमतीची १६१ एकर जमीन जप्त केली. 

मागील काही महिन्यापासून आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाईचा सपाटा लावला होता. याआधी रोहित पवार यांना नोटीस बजावत त्यांच्या कारखान्यावर आणि ‘बारामती अ‍ॅग्रो’ कंपनीशी संबंधित पुणे आणि मुंबईतील कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली होती. 

Rohit Pawar
Rohit Pawar : रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; आज ईडीची चौकशी; शरद पवार गटाचे जारदार शक्तीप्रदर्शन

यादरम्यान शुक्रवारी (ता. ०८) ईडीने रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’शी संबंधित कारवाई करत कारखान्याची १६१ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. यावरून रोहित पवार यांनी, ईडीने केलेली कारवाई ही सुडापोटी करण्यात आल्याचे, म्हटले आहे. 

रोहित पवार म्हणाले,  ‘बारामती अ‍ॅग्रो’ लिमिटेडच्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने कारवाई करत जमीन जप्त केली. मात्र याबाबत कोणतीच माहिती आम्हाला अथवा कारखाना प्रशासनास देण्यात आली नाही. याबाबात ‘बारामती अ‍ॅग्रो’ कंपनीला कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. ही कारवाई बेकायदेशीर असून राजकीय सूडापोटी करण्यात आल्याचे रोहित पवार म्हणाले.

तसेच या कारवाईत अनेक त्रुटी आणि चुका आहेत. यामुळे बारामती अ‍ॅग्रोच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये. कारखाना बंद पडणार नाही ही हमी मी देतो. कारखाना आपल्या मालकीचा असून शेतकरी आणि कामगारांनी निश्चिंत रहावे. आपली बाजू सत्याची आणि न्यायाची आहे हे आपण सिद्ध करू, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका मांडली आहे. 

Rohit Pawar
Rohit Pawar : आमदार रोहित पवारांची कृषिक प्रदर्शनला भेट

काय आहे प्रकरण?

बारामती अ‍ॅग्रोने २०१९ मध्ये औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखाना ५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. या व्यवहारात मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच लिलाव प्रक्रियेतील व्यवहार हे संशयास्पद असल्याचेही ईडीचे म्हणणे आहे. तसेच या लिलावात सहभागी असणाऱ्या हायटेक इंजिनिअरिंग कंपनीला बारामती अ‍ॅग्रोने ५ कोटी रुपयांची रक्कम दिली. तर बारामती अ‍ॅग्रोने विविध बँकांकडून घेतलेली कर्जांचा वापर हा कारखाना खरेदीसाठी केला असाही आरोप ईडीने केला आहे.

ईडीची कारवाई?

यापूर्वी ‘बारामती अ‍ॅग्रो’ कंपनीशी संबंधित प्रकरणावरून ईडीने या प्रकरणी रोहित पवार नोटीस बजावली होती. तसेच त्यांची दोन वेळा ईडी कार्यालयात चौकशी केली होती. तर ‘बारामती अ‍ॅग्रो’ कंपनीशी संबंधित बारामतीतील कार्यालय आणि मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी देखील करण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com