Sugar Production
Sugar Productionagrowon

Sugar Production : यंदा देशभरात साखरेचे उत्पादन वाढणार, इस्माकडून अंदाजे आकडेवारी जाहीर

ISMA : २०२३-२४ मध्ये साखरेचे एकूण उत्पादन ३४० लाख टन होईल असा अंदाज आहे.

Sugar Rate : देशभरात यंदाच्या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने इथेनॉलसाठी साखरेचा वापर न होता २०२३-२४ विपणन वर्षात (ऑक्टोबर-सप्टेंबर) एकूण साखर उत्पादन ३३०.५ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु यंदा साखरेचे उत्पादनात वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

इस्माने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये साखरेचे एकूण उत्पादन ३४० लाख टन होईल असा अंदाज आहे. एकूण साखर उत्पादनाच्या अंदाजे ९.५ लाख टनाने उत्पादन वाढण्याची शक्यता इस्माने व्यक्त केली.

इस्माच्या कार्यकारी समितीने १२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत साखरेची रिकवरी, उसाचे उत्पन्न, उर्वरित तोडणीयोग्य क्षेत्र/ऊस आणि विविध राज्यांतील कारखाने बंद होण्याच्या अपेक्षित तारखांचा अंदाज व्यक्त केला.

दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अद्यापही उसाचे क्षेत्र जास्त असल्याची माहिती आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये उसाची उपलब्धता पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी असल्याची माहिती इस्माकडून देण्यात आली. दरम्यान यंदा महाराष्ट्रात साखर कारखाने उशिरा सुरू झाल्याने महाराष्ट्राचा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.

Sugar Production
Sugar Production : चालू हंगामात साखर उत्पादन किती झालं?

चालू २०२३-२४ साठी, सरकारने आतापर्यंत उसाचा रस/बी-हेवी मोलॅसेसद्वारे इथेनॉल निर्मितीसाठी केवळ १७ लाख टन साखर वळवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे साखर उत्पादन सुमारे ३२३ लाख टन होणार आहे.

२९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत निव्वळ साखरेचे उत्पादन (इथेनॉलसाठी राखीव ठेवल्यानंतर) २५५.५ लाख टन राहणार. देशात अजूनही ४६६ साखर कारखाने सुरु असल्याची माहिती इस्माकडून देण्यात आली आहे.

देशात यंदा साखरेचे उत्‍पादन कमी होण्याचा अंदाज होता. महाराष्ट्रा‍तील ऊस पट्ट्यात अजूनही पूर्ण क्षमतेने साखर कारखाने सुरू आहेत. हंगामापूर्वी महाराष्ट्रातील कारखाने फेब्रुवारीपर्यंत चालतील, असे सांगितले जात होते. परंतु अजूनही खोडवा, निडवा उसाची तोडणी वेळेत होत नसल्याने अजून महिनाभर तरी हंगाम चालेल असे चित्र आहे.

कर्नाटकात यंदा ४० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम संपविला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २५ साखर कारखाने बंद झाले होते. कर्नाटकात आतापर्यंत ४५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी ५१ लाख टन साखर तयार झाली होती. गुजरातमध्‍येही गेल्‍या वर्षीच्या तुलनेत लवकर हंगाम संपण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये ६ कारखाने बंद झाले आहेत. गेल्या वर्षी एकही कारखाना बंद झाला नव्हता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com