Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी

Cotton Rate : ‘सीसीआय’ने ८ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. सुरुवातीला हमीभावापेक्षा जास्त रकमेने खरेदी झाली.

Team Agrowon

Yavatmal News : ‘सीसीआय’ने ८ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. सुरुवातीला हमीभावापेक्षा जास्त रकमेने खरेदी झाली. गेल्या दोन दिवसांपासून ‘ओलाव्या’चे कारण देत हमीभावापेक्षा क्विंटलमागे ५० रुपयांचे दर कमी झाले आहे. याचा फटका शेतकऱ्‍यांना बसत असल्याने दिसून येत आहे.

या वर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे. सुरवातीला अतिवृष्टीमुळे अनेक गावातील पिके खरडून गेली. पिकांना गरज असताना पावसाने दडी मारली. त्याचबरोबर लाल्या रोगासह अळीच्या प्रादुर्भावाचा फटका कापसाला बसला.

या सर्व कारणांमुळे दोन-तीन वेचण्यांतच कापसाची उलंगवाडी झाली आहे. खर्चात मोठी वाढ झाली आहे. वेचणीला मजूर मिळत नाही आणि एकरी चार ते पाच क्विंटलचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे हा दर परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्‍यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

काही जण गरजेपोटी कापूस विक्रीला आणताना दिसत आहेत. परंतु त्यांना नगदी रक्कम हवी असल्याने सरकारी केद्रांऐवजी खासगीत कापूस विकावा लागत आहे. शहरासह ग्रामीण भागात अनेक खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहे. त्याचबरोबर खेडा खरेदीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सांगितले जाते.

खासगीत दर कमी मिळतो, परंतु नगदी असल्याने शेतकऱ्‍यांना नाइलाजास्तव कापूस विकावा लागत आहे. शेतकऱ्‍यांचा कापूस घरात आला आहे. योग्य भाव नसल्याने विक्री रोडावली असून काही शेतकरी गरजेपोटी कापूस विक्रीला आणत आहेत. भविष्यात खासगीत कापसाला भाव वाढेल, अशी शेतकऱ्‍यांना आशा आहे. त्यामुळे सध्या पाहिजे तशी कापूस खरेदी सुरू नाही.

कापसाला सात हजार ४७१ रुपये दर

सीसीआयने सुरुवातीला सात हजार ५२१ या हमीभावानुसार खरेदीला सुरुवात केली. केंद्रावर अकरा हजार २८१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. गुरुवारपासून (ता. ५) शेतकऱ्‍यांना सात हजार ४७१ भाव मिळाला असून, हमीभावापेक्षा ५० रुपये कमी आहे.

या ठिकाणी दरदिवशी एक हजार क्विंटल कापसाची आवक असून, अद्याप खरेदीला हवा तसा वेग आलेला नाही. आधीच न परवडणारा दर त्यात पुन्हा कपात होत आहे. परिणामी, शेतकऱ्‍यांनी घरातच कापूस ठेवला असून शेतकरी भाव वाढीच्या प्रतीक्षेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT