Smart Electricity Meter Agrowon
ॲग्रो विशेष

Smart Electricity Meter : दिवाळीनंतर लागणार तीस लाख स्मार्ट मीटर

Latest Marathi News : नागपूरसह चंद्रपूर आणि गोंदिया येथे स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

Team Agrowon

Nagpur News : मोबाइल सारखेच विजेचे मीटर रिचार्ज करण्याची सुविधा आता नागपुरातील ग्राहकांना मिळणार आहे. नागपूरसह चंद्रपूर आणि गोंदिया येथे स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. वीज बिल अधिक आले की, सामान्य घरगुती ग्राहकांना धक्का बसतो. वीज महाग झाल्‍याने असे धक्के आता नवीन नाही.

केंद्र सरकार संपूर्ण देशात स्मार्ट मीटर बसवून विद्युत यंत्रणा कार्यक्षम बनविणार आहे. राज्यातही या प्रक्रियेला सुरुवात झाली असून विभागानुसार कंपन्यांना स्मार्ट मीटरचे कंत्राट देण्यात आले आहे.

अदानी आणि एनसीसी कंपनीला प्रत्येकी दोन विभागाचे, तर मॉन्टेकार्लो व जिनस कंपनीला एका विभागाचे कंत्राट महावितरणने दिले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कंपनीकडून ३० लाख ३० हजार ३४६ स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. दिवाळीनंतर याचा श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांवर पडणार बोजा

एकूण वीज मीटरचे कंत्राट हे २७ हजार कोटींचे आहे. यात ६० टक्के केंद्र सरकारकडून सवलत दिली जाणार आहे. तर, उर्वरित ४० टक्के महावितरण कंपनीचा भाग आहे. याची किंमत ११ हजार कोटी असेल.

एका मीटरची किंमत १२ हजार रुपये राहील. महावितरण याची वसुली ग्राहकांकडून वीज बिलातून करणार असून तसेच अदानी कंपनीला सर्वात जास्त १४ हजार कोटींचे कंत्राट मिळाले असल्याचे मत वीज तज्ज्ञांनी व्यक्त केले.

फायदे असे...

मोबाइलसारखे स्मार्ट मीटर रिचार्ज करता येईल.

मीटर पोस्टपेड आणि प्रीपेड स्वरूपात उपलब्ध राहील.

महावितरणला मीटर रिडिंगसाठी कर्मचारी पाठविण्याची गरज उरणार नाही.

वापरलेल्या विजेची डेटा हिस्ट्री मिळणार एका क्लिकवर.

तोटे असे...

स्मार्ट मीटरच्या गुणवत्तेवर प्रश्न.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांसह अशिक्षितांना रिचार्जची समस्या.

रिचार्ज कंपन्यांबाबत ग्राहकांमध्ये धास्ती.

जिनस कंपनी सोडली तर इतर कंपन्या स्मार्ट मीटर उत्पादक नाही. त्यामुळे मीटरच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे. एका मीटरची किंमत बारा हजार रुपये आहे. ग्रामीण भागात बारा हजार रुपये ग्राहक वीज बिलापोटी कित्येक वर्षात देखील भरत नाहीत. जर त्यांचे मीटर नादुरुस्त झाले किंवा जळाले तर काय होईल, त्या ग्राहकांना कोणते मीटर देणार, प्रकल्प राबविण्यापूर्वी चाचणी घेतली नाही.
- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ व अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT