Maharashtra Eelction Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election 2024 : सिंचनासाठी पाणी, वीज, शेतरस्त्यांच्या समस्या वर्षानुवर्षे कायम

Farmers Issue : निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. परिणामी परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सिंचनासाठी पाणी, कृषिपंपाचा वीजपुरवठा, शेतीरस्त्यासह गावांना जोडणारे रस्ते विविध पायाभूत सुविधांचे प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे.

Team Agrowon

Parbhani News : निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. परिणामी परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सिंचनासाठी पाणी, कृषिपंपाचा वीजपुरवठा, शेतीरस्त्यासह गावांना जोडणारे रस्ते विविध पायाभूत सुविधांचे प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे.

मानव विकास निर्देशांक आणि औद्योगिक विकासात मागास असलेल्या या जिल्ह्यांत बेरोजगारी वाढली आहे. स्थानिक भागात रोजगार नसल्यामुळे महानगंरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. लोकप्रतिनिंधीची अनास्था यास कारणीभूत आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांचा वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपावर अधिक भर आहे. परंतु शेतीसाठी पाणी, वीज, रस्ते, सक्षम बाजार व्यवस्था, शेतीमालावर प्रक्रिया आधारित उद्योग, बेरोजगारी, स्थलांतर, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा, तोकड्या आरोग्य सुविधा या मुद्यांना सोयीस्कररीत्या बगल दिली जात आहे.

प्रत्येक निवडणूक प्रचारादरम्यान मोठ मोठी आश्वासने दिली जातात. परंतु निवडून आल्यानंतर त्यांचा विसर पडतो. हे चित्र कित्येक वर्षांपासूनचे आहे. परभणी जिल्ह्यात जायकवाडी, निम्न दुधना, माजलगाव, येलदरी-सिद्धेश्वर, तर हिंगोली जिल्ह्यात येलदरी, सिद्धेश्वर, उर्ध्वपैनगंगा, मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळते.

परंतु कालवे, वितरण व्यवस्थेची दुरवस्था, अर्धवट कामामुळे लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. विहिरींची संख्या वाढली आहे. परंतु महावितरणकडून कृषिपंपांना वीजोडण्या देण्यास विलंब लावला जात आहे. सौरकृषी पंप योजनेतील लाभार्थींची संख्या पंधरा हजारांच्या आत आहे. या दोन जिल्ह्यांत अलीकडील काही वर्षात जिल्हा, तालुक्यांच्या ठिकाणांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे झाली आहे.

मागासलेपणाचा शिक्का कायम

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक बाजार समित्यांतील आवक कमी झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या आहेत. विकासाच्या बाबतीत उदासीनता तसेच जनतेच्या प्रश्नांबाबत अनास्था असलेल्या उमेदवारांना सातत्याने निवडून दिले जात असल्यामुळे या दोन जिल्ह्यावरील मागासलेपणाचा शिक्का कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

Well Approval Irregularities: पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिली परस्पर ३७ विहिरींना मंजुरी

Grape Vineyard Destroyed: उभ्या द्राक्ष बागेवर माथेफिरूकडून कुऱ्हाड

Transport Business Issue: ट्रान्सपोर्ट व्यवसाय ‘व्हेंटिलेटर’वर

Tree Cutting Ban: नाशिकमध्ये वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT