Resowing Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Resowing Crisis : रब्बीत अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट

Rabi Season : यंदाच्या हंगामात शेतकरी सातत्याने अडचणीत आहे. आता रब्बी हंगामातसुद्धा शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

Team Agrowon

Akola News : यंदाच्या हंगामात शेतकरी सातत्याने अडचणीत आहे. आता रब्बी हंगामातसुद्धा शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. प्रामुख्याने हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाल्याने अनेकांनी पीक नांगरून दुसऱ्या पिकाची पेरणी धरली.

या वर्षीच्या खरीप हंगामात या भागात जुलैमध्ये सार्वत्रिक पाऊस सुरू झाला. त्यावर पेरणी आटोपली. नंतर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात खंड पडल्याने सोयाबीनसारख्या प्रमुख पिकाचे नुकसान झाले. नंतरच्या काळात गेल्या महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे वेचणीचा कापूस भिजला. तुरीचे पीक जमीनदोस्त झाले.

रब्बीत लागवड केलेले हरभऱ्याचे पीक यंदा बुरशीजन्य रोगांनी घेरले आहे. पिकात मर रोग मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांनी सरसकटपणे पीक मोडणीला प्राधान्य दिले. अकोला, वाशीम जिल्ह्यांत अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.

या हंगामात अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे सुरुवातीला रब्बी लागवडीसाठी जमिनीत पुरेशी ओलच मिळाली नव्हती. सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड केली. शेतकऱ्यांनी अल्प पाण्याच्या उपलब्धतेवर रब्बीत हरभरा आणि गहू पेरला.

हरभरा पीक कोवळ्या अवस्थेत असताना मॉन्सूनोत्तर पावसाने थैमान घातल्याने शेकडो हेक्टरवरील हरभरा पिकाला त्याचा फटका बसला. सतत झालेल्या पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला. त्यामुळे बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन हरभऱ्याचे उभे पीक वाळू लागले. शेतकऱ्यांनी बुरशीजन्य औषधे वापरली. मात्र त्याचा कोणताही उपयोग होत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी हताश होऊन या हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला.

आम्ही पाण्याची कमी उपलब्धता असताना रब्बीत हरभरा पेरला. हे पीक चांगले उगवले होते. मात्र नोव्हेंबरमधील पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला. त्यातच मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने हरभरा पिकात मर रोग वाढून पीक जागेवरच वाळले. त्यामुळे पिकावर ट्रॅक्टर चालवावा लागला.
- सुरेश बाजड, शेतकरी, नावली, ता. रिसोड. जि. वाशीम
यंदाच्या रब्बीत पेरलेल्या हरभरा पिकावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे आम्हाला तीन एकरांतील हरभऱ्याचे पीक मोडून टाकावे लागले. आता या शेतात गहू पेरण्याची तयारी सुरू केली आहे.
-प्रभाकर खुरद, भोसा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Farmer Producer Company : नवअनंत शेतकरी कंपनीची वाटचाल आशादायी

Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

SCROLL FOR NEXT