Resowing : सांगली जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

पावसाची मृग आणि आर्द्रा ही दोन नक्षत्रे कोरडी गेली; मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

सांगली ः जिल्ह्यात मे आणि जूनमध्ये झालेल्या पावसावर (Rain) शेतकऱ्यांनी पेरणी (Sowing) केली. पावसाची मृग आणि आर्द्रा ही दोन नक्षत्रे कोरडी गेली; मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड (Sangli Rain Update) पडला आहे. बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला असून पेरणी केलेली पिके वाया जातील की काय अशी भीती शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे. पाऊस लांबणीवर पडला तर जिल्ह्यात दुबार पेरणीचे (Crisis Of Resowing) संकट ओढवणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.

Kharif Sowing
पुणे जिल्ह्यात खरिपाच्या अवघ्या सात टक्के पेरण्या

जिल्ह्यात खरीप क्षेत्र २ लाख ८४ हजार ८२१ हेक्टर इतके आहे. शेतकऱ्यांनी खरिपाचा पेरा करण्यासाठी संपूर्ण तयारी केली. शिराळा तालुक्यात मे महिन्यात धूळवाफेवर भाताची पेरणी केली जाते. धूळ वाफेवरील भाताची पेरणी पूर्ण झाली. मे महिन्याच्या आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पलूस तालुक्यासह वाळवा तालुक्यात सोयाबीनची आगाप पेरा होतो. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २० हजार हेक्टरवर पेरा झाला असल्याचा अंदाज आहे.

मृग आणि आर्द्रा या दोन नक्षत्रात अपेक्षित पाऊस पडतो; मात्र, ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली. पेरणी केलेल्या भात आणि सोयाबीन पिकासह अन्य पिकांना पाऊस झाला तर नवसंजीवनी मिळणार आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी पिकांना पाणी देऊन जगवण्याची धडपड करत असल्याचे चित्र आहे. जत तालुक्यासह आटपाडी, तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यात बाजरी आणि ज्वारीची पेरणी केली जाते. त्याचबरोबर उडीदही मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात; मात्र या पिकांना एखादा पाऊस पुरेसा असतो. त्या पावसावर उडीद पीक चांगले येते; मात्र दुष्काळी पट्ट्यातही पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पेरणी केलेल्या पिकांना जगवण्यासाठी धडपड सुरू असली तरी, वेळेत पाऊस सुरू झाला नाही तर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढवले तर शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होणार असल्याने आर्थिक फटका नक्कीच बसणार आहे.

आमच्या भागात खरीप हंगामातील शंभर टक्के पेरणी झाली आहे. आता पावसाची वाट पाहत आहोत. वेळेत पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करण्याची वेळ येईल.
इरगोंडा लोहगाव, रावळगुंडवाडी, ता. जत, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com