Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Production : नगर जिल्ह्यात चारा उत्पादनाला प्राधान्य

Green Fodder : यंदा खरिपात सुमारे एक लाख चार हजार हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत. रब्बीतही चारा लागवड वाढेल असा अंदाज आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने दूध व्यवसायाला शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. यंदा खरिपात सुमारे एक लाख चार हजार हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत. रब्बीतही चारा लागवड वाढेल असा अंदाज आहे. पारनेर, संगमनेर, राहुरी, राहाता भागांत चारा पिकांचे क्षेत्र खरिपात अधिक होते.

जिल्ह्यात बहुतांश भागात शेतकरी शेतीसोबत दूध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. मागील दोन वर्षी अपुऱ्या पावसामुळे बहुतांश भागाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. त्याचा परिणाम दूध व्यवसायावर झाला. यंदा मात्र सुरुवातीपासून स्थिती चांगली आहे. पाणी पातळीही वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी चारा उत्पादनाला प्राधान्य दिले असून यंदा खरिपात सुमारे १ लाख ४ हजार ६१५ हेक्टरवर चारा उत्पादन घेतले.

त्यात प्रामुख्याने नगर तालुक्यात ७ हजार ६३३ हेक्टर, पारनेर तालुक्यात १४ हजार १७४ हेक्टर, श्रीगोंदा तालुक्यात ८ हजार ९९६ हेक्टर, कर्जतमध्ये ६ हजार २७८ हेक्टर, जामखेड तालुक्यात २ हजार १६ हेक्टर, शेवगावमध्ये १८०३ हेक्टर, पाथर्डीत ३ हजार १५३ हेक्टर, नेवासा तालुक्यात ८ हजार १० हेक्टर, राहुरीत तालुक्यात ९९०७ हेक्टर, संगमनेर तालुक्यात २०,८०३ हेक्टर, अकोले तालुक्यात ३९६८ हेक्टर, कोपरगाव तालुक्यात ५४७१ हेक्टर, श्रीरामपूर तालुक्यात ४ हजार ६२२ हेक्टर, राहाता तालुक्यात ७,७८० हेक्टरवर चारा उत्पादन घेतले.

यंदा रब्बीतही पाण्याची स्थिती चांगली असल्याने रब्बीत हंगामातही चारा पिकांना प्राधान्य राहणार असल्याचे गृहीत धरुन कृषी विभागाकडून बियाणे, खताचे नियोजन केले जात आहे.

मुरघास करण्यावर भर

नगर जिल्ह्यात संगमनेर, राहाता, राहुरी, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले, नेवासा, शेवगाव भागात दूध व्यवसायाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. मागील दोन वर्षात दुष्काळाच्या झळा सोसल्या, पाणी टंचाईमुळे दूध व्यवसाय अडचणीत आला. यंदा मात्र स्थिती चांगली आहे.

पाणी मुबलक उपलब्ध असल्याने दूध व्यवसाय वाढीला मदत होणार असल्याचे दिसतेय. बहुतांश भागात शेतकरी मुरघास करण्यावर भर देतात. यंदा चारा पिकांचे क्षेत्र वाढताना प्रामुख्याने मुरघास करण्यासाठी मकाची पेरणी अधिक झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दरवर्षी पन्नास लाख टनांपेक्षा अधिक मुरघास शेतकरी करत असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune MTI Journey: ‘एमटीआय’ची आठ दशकी दमदार वाटचाल

Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

SCROLL FOR NEXT