Team Agrowon
जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून मक्याचा चारा उपयुक्त आहे. मक्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण ९ ते ११ टक्के असत.
पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी वर्षातून कोणत्याही हंगामात हे पीक घेता येत. घरच्याघरी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात चारा म्हणून मका लागवडीचा तुम्ही नक्की विचार करु शकता.
जनावरांची निरोगी वाढ आणि प्रजनन क्षमता टिकून राहण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे.
हा चारा चवदार व पाचक असल्याने आहारातील महत्त्वाचे घटक नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध झाल्याने जनावराच्या शरीराच्या कोणत्याही अवयवावर ताण न येता पचन होते. त्यांच्या शरिराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
आहारात जास्त प्रमाणात खुराक आणि कमी प्रमाणात हिरवा चारा असं प्रमाण जास्त काळ राहिल्यास जनावराच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. दर्जेदार हिरव्या चारा अभावी कमजोर वासरे जन्मतात.
जनावरांना दररोज हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी लवकर वाढणारे, पालेदार, सकस, रुचकर, पौष्टिक आणि जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून मका पीक उपयुक्त आहे.
मका चाऱ्याचा उत्तम दर्जाचा मुरघासही तयार करता येतो.