Green Fodder : ग्रामीण भागात हिरवा चारा विक्री सुरू

Animal Fodder : शहरात दुधाची गरज परिसरातील ग्रामीण भागातून भागविली जाते. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते.
Green Fodder
Green FodderAgrowon
Published on
Updated on

Palghar News : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या शेत, माळरान, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवा चारा मिळत असल्याने अनेक गरीब कुटुंबे हा चारा विकून उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवीत आहेत. शहरात दुधाची गरज परिसरातील ग्रामीण भागातून भागविली जाते. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते.

हा ताजा हिरवा चारा ग्रामीण भागातून शहराकडे पुरवला जातो. यामुळेच जनावरांच्या खाद्याचा प्रश्न सुटून उत्पादन क्षमता वाढते. सध्या अनेक शहरी भागात आधुनिक चाऱ्याची निर्मिती केली जाते. त्यासाठी हायब्रीड जातीच्या चाऱ्याची शेतीत लागवड केली जाते. हा चारा दीड ते दोन महिन्यांत कापला जातो. दरवर्षी यांच्या पाच ते सहा कापण्या होतात.

Green Fodder
Fodder Cultivation : गायरान जमिनीवर चारा लागवड करा

सध्या पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत नैसर्गिक हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. जंगल, पडीक जमीनलगत होणारा हा हिरवा चारा आदिवासी पहाटेच्या सुमारास कापून त्यांचे भारे बांधून महामार्गानजीक ठरलेल्या ठिकाणी विक्रीस आणून ठेवतात. तो चारा खरेदी करण्यासाठी ठरलेले व्यापारी सकाळी लवकर वाहन घेऊन चाऱ्याचे वजनाप्रमाणे किंवा प्रति भारा पैसे देऊन विकत घेतात.

Green Fodder
Fodder Cultivation : गायरान जमिनीवर चारा लागवड करा

सध्या पाऊस चांगला पडत असल्याने डोंगरकपारीत, पडीक जमिनीवर मुबलक हिरवा चारा मिळत असल्याने येथील आदिवासी कुटुंबे चारा कापून विकत आहेत. प्रति भारा ५० रुपये, तर काही किलो वजनावर विक्री केला जात आहे. त्यामुळे दिवसाला तीनशे ते चारशे रुपये मिळत आहेत. मनोर, मेंढवण, चारोटी, ओसरवीरा, आवढणी, तलासरी परिसरातील महामार्गाजवळ सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी चाराविक्री करणारी आदिवासी कुटुंबे व खरेदी करणारे ट्रक, ट्रॅक्टर दिसत आहेत.

सध्या पावसाळ्यातली बहुतेक कामे आटोपली आहेत. शहरात अजून कामाला मागणी नाही म्हणून पावसाळ्यात उगवणारा हा ताजा हिरवा चारा विकून पोटापाण्याचा प्रश्न सोडवीत आहोत. यासाठी पहाटे लवकर उठून चारा कापायला जावे लागते.
- नवश्या तांबडा, मजूर
अनेक ठिकाणचा चारा गोळा करून आम्ही मोठ्या ट्रकमध्ये भरून डहाणू, मुंबई, ठाणे येथील तबेल्यांना पाठवून देतो. यासाठी पहाटे उठावे लागते. फक्त महिना ते दीड महिना या हिरव्या चाऱ्याचा व्यवसाय सुरू असतो.
- गोविंद शर्मा, गवत व्यावसायिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com