Principal Borade : मराठी ग्रामीण साहित्यात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक तथा प्राचार्य रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा.रं.बोराडे यांचं मंगळवारी (ता.११) वृद्धपकाळाने निधन झालं. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात बोराडे यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मराठी ग्रामीण कांदबरीकार आणि कथाकार अशी प्राचार्य बोराडे यांची ओळख होती. नुकताच त्यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. ते माजी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षदेखील होते.
प्राचार्य बोराडे यांनी १९७१ साली मराठी भाषेत 'पाचोळा' ही कादंबरी लिहिली. या कादंबरीचे कथानक आधुनिकीकरणामुळे ग्रामीण जीवनावर झालेल्या परिणामांवर आधारित आहे. पाचोळ कादंबरीने प्राचार्य बोराडे यांना 'पाचोळा'कार अशी ओळख मिळवून दिली.
प्राचार्य बोराडे यांनी मराठी साहित्यात विपुल लेखन केले. पेरणी, ताळमेळ, मळणी, वाळवण, राखण, गोंधळ, माळरान, बोळवण, वरात, फजितवाडा, खोळंबा, बुरूज, नातीगोती, हेलकावे, कणसं, आणि कडबा यासारख्या कथासंग्रहाने ग्रामीण भागातील दुख दैन्य मांडले. वाचकांच्या काळजाला साद घालणारी सरळ सोपी शैली त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य समजलं जातं.
प्राचार्य बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९४० रोजी लातूर जिल्ह्यातील काटगावमध्ये झाला. त्यांचं कुटुंब शेतकरी होते. प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी गाव सोडलं. माढा, बार्शी, सोलापूर, संभाजीनगर या ठिकाणी शिक्षण पूर्ण केले. १९५७ साली त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर कथा, कादंबरी, नाटक अशा विविध साहित्य प्रकाराचं त्यांनी लेखन केलं.
प्राचार्य बोराडे यांनी परभणी येथील शिवाजी महाविद्यालय, वैजापुर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात १९९१ पर्यंत प्राचार्य म्हणून जबबादारी सांभाळली. तर देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य पदावर ते होते. १९८९ साली हिंगोली येथे आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य बोराडे होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.