Punjab Plans Use AI In Agriculture : पीक उत्पादकता, शाश्वतता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंजाब सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी आयआयटी रोपड येथील सेंटर ऑफ एक्सलन्सची मदत घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे..कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री गुरमीत सिंग खुदियां यांच्या अध्यक्षतेखाली पंजाब भवनमध्ये झालेल्या एका बैठकीत एआय आधारित उपाययोजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच शेती स्तरावर याचा वापर करण्यासाठीचा एक कृती आराखडाही तयार करण्यात आला. नवीन तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना ठोस फायदे मिळायला हवेत, असे खुदियां यांनी म्हटले आहे..त्यांनी प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पांसाठी आणि राज्यभरात एआयचा वापर करण्यासाठी सरकार मदत करेल, असे आश्वासन दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्रे सुरु करण्याचे, आकडेवारी संकलनात शेतकऱ्यांना सहभागी करून घेणे, फलोत्पादन क्लस्टर्सना सहकार्य करणे आणि एआय आधारित पशुधन उत्पादकता उपाययोजनांचा विस्तार करण्याचे निर्देशही दिले आहेत..MahaVISTAAR AI App: शेतकऱ्यांना तत्काळ पीक सल्ला, हवामान अंदाज अन् बाजारभाव माहिती, जाणून घ्या 'महाविस्तार ॲप'ची वैशिष्ट्ये.तरुण आणि शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अचूक शेती आणि शेती क्षेत्रामध्ये एआयचा वापर, यावर राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम सुरू करण्याच्या आयआयटी रोपडच्या निर्णयाचे स्वागत केले. पंजाबमधील विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांसाठी जागा राखीव ठेवल्याने राज्याच्या कृषी तंत्रज्ञान क्षमतेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..Ai in Agriculture: ‘एआय’ आधारित तीन उपकरणांच्या आरेखनाला पेटंट.यामुळे पंजाबला शेतीत एआयचा वापर करणारे राज्य म्हणून आघाडी घेण्यास मदत होईल. तसेच संसाधनांची कार्यक्षमता वाढवणे, हवामान बदलांना सामोरे जाण्याची क्षमता आणि शाश्वत वाढीत सुधारणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे..आयआयटी रोपडचे पुष्पेंद्र पी सिंग यांच्या माहितीनुसार, केंद्राच्या सुमारे ३१० कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याने स्थापन झालेले सेंटर ऑफ एक्सलन्स, एआयवर आधारित पीक सल्ला प्रणाली, बहुभाषिक शेतकरी चॅटबॉट्स, पीक उत्पादन अंदाज मॉडेल, माती आरोग्य विश्लेषण, हवामान साधने आणि स्मार्ट पशुधन व्यवस्थापनावर काम करत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.