Buldhana News: रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण असून रब्बीमध्ये हरभरा पिकाची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी केली जाते. या वर्षी डिसेंबर अखेर रब्बीचे १०२ टक्के क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. अद्यापही पेरण्या सुरू असल्याने सरासरी क्षेत्र लागवडीखाली येईल, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे..बुलडाणा जिल्ह्यात या वर्षी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, यातून शेतकरी सावरत रब्बी हंगामासाठी पुन्हा शेतात उतरला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत उत्पादकता घटली होती. सोबतच उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु जमिनीत असलेली ओल, सिंचनाच्या सोयी असल्याने रब्बी पिकांसाठी फायदेशीर वातावरण ठरले. परिणामी या पिकांच्या लागवडीला वेग आला. डिसेंबर महिन्यात आजवर वेगाने पेरणी झाली..Rabi Sowing: बुलडाण्यात रब्बी पिकांची पेरणी १०० टक्क्यांवर.कृषी विभागाने यावर्षी तीन लाख २९ हजार ८०३ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नियोजन केले होते. त्यापैकी तीन लाख ३७ हजार १५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी यंदा हरभरा व गव्हाला अधिक पसंती दिली आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र दोन लाख २६ हजार हेक्टर असून आजवर दोन लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी आटोपली. सरासरीच्या ९५ टक्के क्षेत्र हरभरा लागवडी खाली आहे..Rabi Sowing: देशात रब्बी पेरणी क्षेत्रात आठ लाख हेक्टरने वाढ .गव्हाचे सरासरी क्षेत्र ६६४८६ हेक्टर असून प्रत्यक्षात ७८२८३ हेक्टरवर पेरणी झाली. मक्याच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मक्याचे रब्बीत १७ हजार ४४८ हेक्टर क्षेत्र असून प्रत्यक्षात ३१ हजार १२ हेक्टरपर्यंत लागवड पोचली. मक्याची लागवड झालेली आहे. ओल व सिंचनाच्या सोयी असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. अनियमिततेमुळे नवीन पिकांमध्ये प्रयोग सुरू केले आहेत..नगदी उत्पन्न देणाऱ्या पिकांना प्राधान्यहळद, आले, चिया, राजमा यांसारख्या पिकांकडे शेतकरी वळत आहेत. तेलवर्गीय पिकांचे क्षेत्र वाढवण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले असले तरी शेतकरी नगदी उत्पन्न देणाऱ्या पिकांना प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात गहू, हरभरा व मक्याचे क्षेत्र वाढले असले तरी करडई ३८३हेक्टर, तीळ २९ हेक्टर आणि सूर्यफुल ४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. अद्यापही खरिपातील पिकांची काढणी करून शेतकरी हरभरा, गहू लागवड केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.