Fruit and Vegetable Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Chakan Vegetable Market : पावसामुळे चाकणला फळभाज्यांचे दर वाढले

Fruit and Vegetable Rate : चाकण येथील महात्मा फुले बाजार आवारात आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने फळभाज्यांचे भाव वधारले.

Team Agrowon

Chakan News : चाकण येथील महात्मा फुले बाजार आवारात आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने फळभाज्यांचे भाव वधारले. कोथिंबीर मात्र मातीमोल झाली. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाऊस असल्याने कोथिंबिरीचे भाव पारच घसरले आहेत.

टोमॅटोची आवक सातारा तसेच नगर जिल्ह्यातून होत आहे. टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. टोमॅटो घाऊक बाजारात साठ रुपये प्रतिकिलोने विकला गेला. टोमॅटोचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आवक कमी व पावसाचा परिणाम यामुळे फळभाज्यांचे भाव वाढले आहेत.

कर्नाटक राज्यातून सुमारे ३० टन हिरव्या मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीचे भाव घाऊक बाजारात प्रतिकिलोला ५० रुपये राहिले. हिरवी मिरची किरकोळ बाजारात ६० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. कांद्याची आवक ८५० क्विंटल झाली. आवक घटली आहे. कांद्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २० ते ३० रुपये दर मिळाला. बटाट्याचे भाव वाढत आहेत. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे.

या बटाट्याला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात बटाटा प्रति किलोला ४० रुपये दराने विकला जात आहे. कांद्याचे भाव अजून वाढतील अशी शक्यता शेतकरी, व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कोथिंबिरीची एक जुडी घाऊक बाजारात अगदी चार, पाच दहा रुपयांना एक या दराने विकली जात आहे. कोथिंबीर उत्पादकांचे पावसाने नुकसान झाले, अशी माहिती खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

लसणाचे दर वाढण्याचा अंदाज

चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात लसणाची आवक गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या परराज्यातून झाली. ही आवक ३० टन झाली. लसणाचे भाव प्रति किलोला घाऊक बाजारात १०० ते १७० रुपये आहे. किरकोळ बाजारात लसूण २०० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. लसणाचे दर गेल्या चार महिन्यापासून स्थिर आहेत. लसणाचे भाव अजून वाढतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT