Vegetable Rate : पावसाचा हाहाकार भाजीपाला कुजला; दरात वाढ, आवक थंडावली

Vegetable Market Rate : बाजार समितीत कर्नाटक आवक ठप्प झाली असून, स्थानिक आवक थंडावली आहे.
Vegetable Rate
Vegetable Rateagrowon
Published on
Updated on

Kolhapur Vegetable Market : पावसामुळे आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढली होती परंतु कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने पुन्हा भाजी पाल्याची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. बाजार समितीत कर्नाटक आवक ठप्प झाली असून, स्थानिक आवक थंडावली आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव येत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर काही ठिकाणी शेतात पाणी राहिल्याने भाजीपाला कुजून जात असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावं लागत आहे.

स्वीट कॉर्न मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीला आहेत. टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. भाज्यांचे दर दुप्पटीने वाढले आहेत. हंगाम नसल्याने फुलांचा भाव गळून पडला आहे. गुलाबाचे दर टिकून आहेत. धान्य बाजारात डाळींचे दर काहीसे वाढले आहेत.

प्रति किलो रुपये भाजीपाला

टोमॅटो- ७० ते ८०, दोडका- ७० ते ८०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची - ७० ते ८०, फ्लॉवर - ३० ते ४०, बटाटा- ४० ते ५०, कांदा - ३५ ते ४०, लसूण- २०० ते २५०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ४०० शेकडा, गाजर - ४० ते ५०, बीन्स- ४० ते ५०, गवार - १०० ते १२०, भेंडी- ५० ते ६०, देशी काकडी- १०० ते १२०, काटा काकडी - ४० ते ५०, दुधी - ४० ते ५०, पालेभाज्या - १०-१२ पेंढी, कोथिंबीर- १० ते १५ मेथी - १० ते १५, कांदापात - १५, शेवगा - ८ ते १० रुपये नग.

फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - १२० ते १५०, गुलाब - २०० ते २५०, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १०० ते १२०.

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ- ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ९० ते १०० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०.

खाद्यतेल : सरकी - ११२ ते ११५, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - ११२ ते ११५, पामतेल - १०५ ते ११०, सूर्यफूल - ११० ते ११५.

Vegetable Rate
Heavy Flood Kolhapur : आठवडाभराच्या पावसाने कोल्हापूर पाण्यात; पाऊण कोटींचे नुकसान, अनेक गावांचा संपर्क तुटला

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ८३ ते ८६, तूरडाळ- १६० ते १७८, मूगडाळ -११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १०० ते ११०, मटकी- १०५ ते ११५, मसूर- ७० ते ७५, फुटाणाडाळ - ११५ ते १३०, चवळी- १०० ते १३०, हिरवा वाटाणा- १२० ते १४०, छोला -१२० ते १५०.

नदी माशांची आवक घटली

समुद्री माशांची आवक बाजारात नाही. त्यामुळे खवयांची मागणी नदी माशांवर आहे, मात्र नद्यांना पूर आल्याने मासेमारी व्यवसायही संकटात आहे. बाजारात नदी माशांची आवक कमी असून, दरात २५ ते ४० रुपयांची वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com