Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Onion Market : सरकार म्हणते की देशात कांद्याच पुरेसा स्टाॅक उपलब्ध आहे. तसेच खरिपातील लागवड २७ टक्क्यांनी वाढेल. यामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील, असाही दावा सरकारने केला.
Onion
Onion Agrowon
Published on
Updated on

Pune News : कांदा ३ हजारांच्या जवळ गेल्यानंतर मोठी तेजी येईल, अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती. पण कांद्याचे भाव पुन्हा काहीसे कमी झाले. त्यातच सरकार या ना त्या कारणानं कांदा भाव कमी कसे राहतील, याची काळजी घेत आहे. निर्यातीत अडथळे, बाजारावर दबाव, व्यापाऱ्यांची कोंडी असे फंडे सरकार सर्सास वापरते. आता  सरकार म्हणते की देशात कांद्याच पुरेसा स्टाॅक उपलब्ध आहे. तसेच खरिपातील लागवड २७ टक्क्यांनी वाढेल. यामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील, असाही दावा सरकारने केला. 

केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. त्यात या मंत्रालयाने म्हटले आहे की, रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन घटले होते. तरीही देशात कांद्याचा पुरवठा पुरेसा आहे. रब्बी हंगामात १९१ लाख टन कांदा उत्पादन झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादन १८ टक्क्यांनी घटले. सध्या बाजारात केवळ रब्बीचा कांदा येत आहे. तसेच बाजारातील आवकही बरी सुरु आहे. मंत्रलायाने असेही म्हटले आहे की देशाला महिन्याला १७ लाख टन कांद्याची गरज असते. तर महिन्याला १ लाख टनांच्या आतच निर्यात होत आहे. म्हणजेच महिन्याला देशाची गरज आणि निर्यात धरून १८ लाख टन कांदा लागतो. त्यामुळे खरिपाचा कांदा बाजारात येईपर्यंत पुरवठा सुरळीत राहील, असा याचा अर्थ. 

Onion
Onion Market : कांदाप्रश्‍नी केंद्र सरकारचे वरातीमागून घोडे

थोडक्यात ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे म्हणणे आहे की, उत्पादन घटले तरी पुरवठा पुरेसा राहू भाव नियंत्रणात राहू शकतात. पण सध्या कांदा साठ्याची स्थिती पाहीली तर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांकडे स्टाॅक जास्त असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मग पुढे कांद्याचा पुरवठा टाईट दिसत असेल तर निश्चित चांगल्या भावाच्या अपेक्षेने माल मागे ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे सरकार केवळ पुरठ्यावर अवलंबून न राहता भाव नियंत्रणासाठी धोरणही राबवू शकतं, हेही तेवढेच स्पष्ट आहे. 

यंदा कांदा काढणीनंतर कोरडे वातावरण होते. त्यामुळे कांद्याचे नुकसान झाले नाही. चाळीतील कांद्याची स्थितीही चांगली आहे. तसेच बाजारात गेल्यावर्षीपेक्षा जास्त भाव दिसत असल्याने आणि पावसाळ्यात कांदा खराब होण्याची शक्यता असल्याने शेतकरी कांदा विकत आहेत. कांदा चाळीतून बाहेर येत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव स्थिरावले आहेत, असेही केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने म्हटले आहे. 

Onion
Onion Market : ‘एनसीसीएफ’ कांदा खरेदीत पुन्हा फेरबदल

देशात यंदा वेळेवर पाऊस आला आणि कांदा उत्पादक भागात पावसाचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे कांदा लागवडी सुरु झाल्या. त्यामुळे यंदा खरिपातील कांदा लागवड २७ टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दीष्ट असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. यंदाच्या खरिपात कांदा लागवड ३ लाख ६१ हजार हेक्टरवरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.  खरिप कांदा लागवडीत कर्नाटक महत्वाचे राज्य आहे. कर्नाटकात आतापर्यंत ३० टक्के लागवड पूर्णही झाली. कर्नाटकात १ लाख ५० हजार हेक्टरवर कांदा लागवडीचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये लागवडी वेगाने सुरु आहेत, असाही दावा ग्राहक व्यवहार मंत्रालयाने केला आहे. 

सरकारने खरिपातील कांदा लागवड वाढीचे उद्दीष्ट ठेवले. पण अनेक भागात सध्या पुरेसा पाऊस नाही. तरीही शेतकरी उपलब्ध साधनांचा वापर करून लागवडी करत आहेत, हेही तेवढेच खरे आहे. पण कांदा उत्पादन केवळ लागवडी वाढल्या म्हणून वाढेल, असे समजणेही दिशाभूल ठरेल. कारण काढणीच्या काळातील पाऊसही तेवढाच महत्वाचा असतो. त्यामुळे प्रत्यक्षा कांदा हाती आल्यानंतरही उत्पादनाची स्थिती स्पष्ट होऊ शकते. पण सध्याचा पाऊस आणि पुढील पावसाचे ढोबळ अंदाज लक्षात घेतले तर परिस्थिती वेगळीही दिसू शकते. 

सरकारने म्हटल्याप्रमाणे रब्बीत काही दिवस सोडले तर उत्पादन कमी असल्याने सरासरीपेक्षा चांगला भाव बाजारात दिसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त माल विकला. शेतकऱ्यांकडे आता कमी माल आहे. हा माल व्यापाऱ्यांच्या आणि स्टाॅकीस्टच्या हाती गेला, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काळातही बाजारात आवकेचा दबाव दिसणार नाही. पण अनेकदा बाजारात वेगवेगळ्या प्रकाराने चलाखी केली जाते. त्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेऊन टप्प्याटप्प्याने माल विकल्यास फायदेशीर ठरू शकते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com