Fruit Market Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Market : हंगामी फळांना बाजारपेठेत ‘भाव’

Fruit Demand : बाजारपेठेत सध्या हंगामी फळांना मागणी वाढली आहे. कारण फळांचा राजा असलेल्या हापूसचा शेवटचा बहर असल्यामळे सध्या बाजारात आंब्याची आवक कमी झाली आहे.

Team Agrowon

Vashi News : बाजारपेठेत सध्या हंगामी फळांना मागणी वाढली आहे. कारण फळांचा राजा असलेल्या हापूसचा शेवटचा बहर असल्यामळे सध्या बाजारात आंब्याची आवक कमी झाली आहे; तर जांभूळ, लिची, करवंदे, चिकू या फळांची आवक वाढल्याने हंगामी फळांना बाजारपेठेत ‘भाव’ मिळत आहे.

सुदृढ आरोग्यासाठी पौष्टिक आहाराच्या जोडीला रसदार फळांचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. हंगामी फळांना सध्या जोरदार मागणी आहे. केशर, बदाम, पायरी, लालबाग या आंब्याच्या वाणांना सर्वसामान्यांकडून मागणी आहे. याशिवाय मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी उपयुक्त असलेल्या जांभळालाही चांगली मागणी आहे.

जांभळाची २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. त्याचप्रमाणे बाजारात चिकू ४० ते ५० रुपये किलो, मोसंबी ५० ते ६० रुपये किलो, पपई १४ ते ३० रुपये किलो, संत्रा ३० ते ९० रुपये किलो, पीच १५० ते १८० रुपये किलो दराने विकले जात आहे.

लिचीला खवय्यांची पसंती

याशिवाय बिहार, पश्चिम बंगालमधून आलेली लिचीही खवय्यांच्या पसंतीस उतरत असून घाऊक बाजारात १४० ते १६० रुपये किलोने लिचीची विक्री होते आहे. शाही आणि चायना लिची या दोन प्रकारच्या वाणांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT