Jalyukt Shiwar Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Jalyukt Shiwar Scheme : ‘जलयुक्त’ पुन्हा ‘कृषी’कडे हस्तांतरित करण्यासाठी दबाव

Agriculture Department : जलयुक्त शिवार योजना पुन्हा कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयास कृषी अधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : जलयुक्त शिवार योजना पुन्हा कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयास कृषी अधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र त्याला न जुमानता शासनस्तरावरून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

२०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात शाश्वत सिंचनाच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. योजनेच्या पाच वर्षांतील कालावधीत सर्वाधिक कामे कृषी विभागाने केली आहेत. दरम्यान या योजनेतील कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य झाली नसून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्याने सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजयकुमार यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली.

त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही चौकशी प्रारंभ करण्यात आली. तत्कालीन महाविकास आघाडीने ही योजना रद्द करीत लावलेला ब्रेक सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने काढला व जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनला मंजुरी दिली.

या योजनेची जबाबदारी मृद व जलसंधारण विभागाकडे असताना ५ फेब्रुवारी २०२४ ला पुन्हा कृषी विभागाकडे सचिव पद सोपवत योजनेच्या अंमलबजावणीचे आदेश काढले. या आदेशास राज्यातील सर्व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी विरोध करीत सचिवपद स्वीकारण्यास नकार दिला आहे.

या योजनेसाठी स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग कार्यरत असून गेल्या दीड ते दोन वर्षांपासून या विभागामार्फत अंलबजावणी सुरू आहे. त्यामुळे या योजनेचे सदस्य सचिवपद अर्धवट स्थितीत घेणे सयुक्तिक ठरणार नसून या विभागास तांत्रिक दर्जा असल्याने त्यांच्याकडूनच अंमलबजावणी योग्य ठरेल, असे जिल्हा कृषी अधिकारी संघटनेचे मत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT