Thane News: नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांची कुंभमेळ्यासाठी होणारी प्रस्तावित तोड तातडीने थांबवावी, अशी मागणी ठाण्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. .तपोवनातील वृक्षांवर कुऱ्हाडीचा घाव घालणे म्हणजे एकाच वेळी संतांची पावन भूमी आणि नाशिककरांच्या वृक्षरूपी आईवर घाव घालण्यासारखे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने साधुसंतांच्या या पावन भूमीवरील वृक्षाची छाया नष्ट करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे..Environment Conservation : विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा.तपोवन परिसर नाशिकचे ‘हरित हृदय’ मानले जाते. सकाळच्या धावण्यापासून विद्यार्थ्यांच्या व्यायामापर्यंत, पक्ष्यांच्या घरट्यांपासून साधुसंतांच्या ध्यानधारणेपर्यंत, या झाडांनी शहराच्या जीवनशैलीला आधार दिला आहे. अनेक शतके उभ्या असलेल्या या वृक्षांच्या कापण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडताच नागरिकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे..कुंभमेळाच्या नियोजनासाठी निसर्गाच्या हानीचा मार्ग स्वीकारणे अयोग्य आहे. कुंभमेळा १२ वर्षांनी येतो, पण तोडलेली झाडे परत येत नाहीत. तपोवन नाशिकचा आत्मा आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हेच आजच्या महाराष्ट्राला शोभणारे निर्णय असतील, असे डॉ. प्रशांत सिनकर यांनी म्हटले आहे..Environment Conservation : पर्यावरण संवर्धनामध्ये मधमाशी मोलाची....वृक्षतोडीला पर्याय उपलब्धया वृक्षतोडीला पर्यायी उपाय उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. स्टिल्ट/उंच बांधकाम, तात्पुरत्या संरचनांचे स्थलांतर, वापरात नसलेल्या शासकीय जमिनींचा पुनर्वापर, नदीकाठी पर्यावरणपूरक नियोजन अशा पर्यायांचा शासनाने विचार करावा, अशीही त्यांनी मागणी केली..समाजमाध्यमांवर मोहीमतपोवनातील झाडांच्या संरक्षणासाठी विविध पर्यावरणप्रेमी, नागरिक संघटना आणि स्थानिक रहिवासी पुढे येत आहेत.कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीविरोधात समाजमाध्यमावरही ‘तपोवन वाचवा’ या मोहिमेला वेग आला आहे. सिनरकर यांनी मुख्यमंत्र्याकडे पाठवलेल्या निवेदनानंतर आता पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांसह सर्वांच्याच नजरा सरकारच्या निर्णयाकडे लागल्या आहेत..तपोवनातील झाडांची तोड ही नाशिकच्या आत्म्यावरचा घाव आहे. कुंभमेळा महत्त्वाचा आहे, पण निसर्गाचा बळी कधीच स्वीकारार्ह नाही. झाडे वाचवण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा.- डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक, ठाणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.