Jalyukt Shiwar : ‘जलयुक्त शिवार’ टप्पा दोनमध्ये नाशिक राज्यात दुसरे

Jalyukt Shiwar Yojana : राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे
Jalyukt Shiwar
Jalyukt ShiwarAgrowon

Nashik News : राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यात यवतमाळ प्रथम असून या जिल्ह्यात २९७ गावांमध्ये २३ कोटी रुपये, तर नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये १९ कोटी ८८ लाख रुपये खर्च झाले असून, तिसऱ्या क्रमांकावरील नागपूर जिल्ह्यात २४३ गावांत १७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. कामे पूर्ण केलेल्या ठेकेदारांना मृद व जलसंधारण विभागाने शंभर टक्के देयके अदा केली आहेत.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar Scam : ‘जलयुक्त’चा अहवाल सादर करण्याचे आदेश

जलयुक्त शिवार योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर महायुती सरकारने जानेवारी २०२३ मध्ये दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. राज्यात निवडलेल्या ५ हजार ६७१ गावांमध्ये ‘जलयुक्त’च्या कामांसाठी अडीच हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. जलसाठा वाढवण्यासाठी लघुपाटबंधारे, कृषी व वन विभागाच्या माध्यमातून कामे करण्यात आली.

कामांची गती व उपलब्ध निधीच्या आधारे सरकारने ४३६ कोटी रुपये दिले आहेत. त्यापैकी वर्षभरात ३०६ कोटी रुपये खर्च झाले असून, यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २३ कोटी, तर जिल्ह्यात १९ कोटी ८८ लाख रुपये खर्च झाले आहेत. पाण्याच्या स्रोतांचे खोलीकरण, रुंदीकरण, मातीच्या आणि सिमेंटच्या बंधाऱ्यांचे बांधकाम, नाल्यांच्या दुरुस्त्या आणि शेततळ्यांची निर्मिती ही प्रमुख कामे या योजनेतून करण्यात येतात.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar : ‘जलयुक्त शिवार’ च्या ७०७ कामांची तांत्रिक, प्रशासकीय मान्यता रखडली
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची कामे झाली आहेत. कामे पूर्ण केलेल्या ठेकेदारांना मार्चअखेर संपूर्ण देयके अदा केली आहेत. निधी खर्चात नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकांवर आहे.
हरिभाऊ गिते, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक

विभागनिहाय झालेला खर्च (कोटी)

जिल्हा परिषद मृद व जलसंधारण विभाग ८ कोटी

मृद व जलसंधारण विभाग ५कोटी ८० लाख

उपवनसंरक्षक पूर्व विभाग दोन कोटी ७१ लाख

उपवनसंरक्षक पश्चिम विभाग २ कोटी २० लाख

कृषी विभाग १ कोटी

जिल्हानिहाय गावे व झालेला खर्च (कोटी रुपये)

यवतमाळ २९७ २३ कोटी ९ ला

नाशिक २३१ १९ कोटी ८८ लाख

नागपूर २४३ १७ कोटी

अमरावती २८८ १५ कोटी ३१ लाख

नांदेड २२९ १४ कोटी ६९ लाख

वर्धा १७८ ११ कोटी ९९ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com