Jalyukt Shiwar : ‘जलयुक्त शिवार’ च्या ७०७ कामांची तांत्रिक, प्रशासकीय मान्यता रखडली

Jalyukt Shiwar Abhiyan : राज्याला पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड करण्यात आली आहे.
Jalyukt Shiwar
Jalyukt ShiwarAgrowon

Parbhani News : राज्याला पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड करण्यात आली आहे. याअंतर्गंतच्या ८७५ पैकी केवळ १६८ कामांना तांत्रिक व प्रशासकीय परंतु उर्वरित ७०७ कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे अद्याप कामे सुरु होऊ शकली नाहीत.

जिल्ह्यात सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी प्रस्तावित जलसंधारणाची कामे शास्त्रोक्त पद्धतीने येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु संबंधित यंत्रणांतील अनेक अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे तांत्रिक व प्रशासकीय मान्यता रखडलेल्या आहेत.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar : ‘जलयुक्त’चे दफ्तर ‘जलसंधारण’मध्ये पडून

जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीस सतत अनुपस्थित राहणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आल्या, असल्याचे सूत्रांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गंत निवडलेल्या ९१ गावांतील जलसंधारणाच्या विविध यंत्रणानिहाय कामांच्या आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीने मंजुरी दिली आहे.

त्यात ढाळीचे बांध, सलग समतळ, खोल सलग समतळ चर, शेततळी, अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, आदी कामे होणार आहेत. भिसरण न वगळता विविध यंत्रणानिहाय कामांमध्ये कृषी विभागअंतर्गंत १७ हजार ९५९ हेक्टरवरील ७८९ कामांसाठी २५ कोटी ३४ लाख ५० हजार रुपये तर जलसंधारण विभागाअंतर्गंत २८० कामांसाठी ३४ कोटी ४९ लाख ५० हजार रुपये, वन विभागाअंतर्गत ६६० हेक्टरवरील ११६ कामांसाठी ११ कोटी ३३ लाख रुपये निधीची तरतूद आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत लघु पाटबंधारे विभागामार्फत २३ कामांसाठी ६२ लाख ५० हजार रुपये, भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ६६ कामांसाठी ४२ लाख ९० हजार रुपये निधीची तरतूद आहे. एकूण १८ हजार ६१९.८२ हेक्टरवरील १ हजार २७४ कामांसाठी ७२ कोटी २२ लाख ४८ हजार रुपये निधी आवश्यक आहे. अभिसरण वगळून सर्व यंत्रणांची मिळून एकूण ७ हजार ४४८ हेक्टरवर प्रस्तावित ८७५ कामांसाठी ५४ कोटी रुपये निधीची गरज आहे.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar : जलयुक्त शिवारच्या जिल्हा, तालुका समितीचे सचिवपद ‘कृषी’कडे

१६८ कामांना तांत्रिक, प्रशासकीय मान्यता...

आजवर १८ कोटी ७५ लाख ४२ रुपये किंमतीच्या १६८ कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यात कृषी विभाग अंतर्गंतच्या कामांचा समावेश नाही. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग अंतर्गंतची २० लाख ३१ हजार रुपये खर्चाची ९ कामे, जलसंधारण विभागाची १६ कोटी २ लाख ८६ हजार रुपये किंमतीची १२७ कामे, वन विभागाची २ कोटी ९ लाख ३४ हजार रुपयाची २१ कामे, भूजल सर्वेक्षण विभागाची ४२ लाख ९ हजार रुपयाची ११ कामे आहेत.

जलयुक्त शिवार अभियान २.० आराखड्यातील प्रस्तावित कामे (निधी कोटी रुपये)

तालुका गावांची संख्या कामांची संख्या क्षेत्र हेक्टर निधी

परभणी १० ९९ १०९ ६.१८

जिंतूर २६ ४६१ ४२६० २६.७५

सेलू ८ २६ ०० २.२२

मानवत २ २८ २५० ०.६५

पाथरी ३ २ ०० ०.५६

सोनपेठ ६ २४ ०० ०.२७

गंगाखेड २० ८६ ६८९ ६.४०

पालम १० १०६ १९४० ८.३३

पूर्णा ६ ४८ २०० ३.३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com