Adv Rahul Padwal Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming: सेंद्रिय शेतीविषयी आफ्रिकेत सादरीकरण

Indian Farming Model: मंचर येथील कृषितज्ज्ञ ॲड. राहुल पडवळ यांनी नैरोबी (केनिया) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘एआयसीएडी’ परिसंवादात भारताचे प्रतिनिधित्व करत सेंद्रिय शेती आणि पर्यावरण संतुलनावर प्रभावी सादरीकरण केले.

Team Agrowon

Manchar News: मंचर येथील कृषितज्ज्ञ ॲड. राहुल पडवळ यांनी नैरोबी (केनिया) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘एआयसीएडी’ परिसंवादात भारताचे प्रतिनिधित्व करत सेंद्रिय शेती आणि पर्यावरण संतुलनावर प्रभावी सादरीकरण केले. पूर्व आफ्रिकेतील उच्चपदस्थ शासकीय अधिकारी, विद्यापीठांचे कुलगुरू आणि तज्ज्ञांपुढे शाश्वत शेतीत भारताचे प्रयोग कसे दिशादर्शक ठरू शकतात हे त्यांनी सांगितले.

ॲड. पडवळ यांना ‘आफ्रिकन क्षमताविकास संस्थेने (एआयसीएडी)’ निमंत्रित केले होते. दहा दिवसांचा दौरा करून ते नुकतेच मंचर येथे आले आहेत. ‘‘मातीचे आणि मानवी आरोग्य वाचवायचे असेल तर रसायनमुक्त शेती हाच एकमेव पर्याय आहे,’’ असा संदेश त्यांनी दिला. पडवळ सध्या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पात सहायक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून, आफ्रिकेतील अनेक कृषी प्रकल्प व प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटून मातीची सद्यःस्थिती आणि भविष्यातील धोरणात्मक दिशा यावर सखोल अभ्यास करत आहेत.

‘सेंद्रिय कृषी निवेष्ठांचे पर्यावरण संतुलनासाठी महत्त्व व शाश्वत शेतीतील स्थान’ या विषयावर त्यांनी सविस्तर सादरीकरण केले. त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात संवाद पार पडला. ‘पूर्व आफ्रिकेतील शेती व मातीची सद्यःस्थिती व भविष्य’ या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला.

सध्या जगभरात रासायनिक खते व कीटकनाशकांच्या झालेल्या दुष्परिणामांतून भविष्यातील अन्नसुरक्षा धोक्यात आली असून मातीच्या व मानवी आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होत आहेत. पूर्व आफ्रिकेतील देशांनी त्यातून बोध घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शाश्वत शेती पद्धतींच्या माध्यमातून आवश्यक पावले उचलत या देशांसाठी विस्तृत धोरण आखणीच्या संदर्भात चर्चा झाली.

प्रश्नोत्तरांच्या सत्रात, पूर्व आफ्रिकेतील मातीची सद्यःस्थिती, कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम व अन्नसुरक्षेवरील धोके यावर मुद्देसूद माहिती दिली. भारतीय सेंद्रिय व नैसर्गिक शेतीतील प्रयोगांचे अनुभव शेअर केले. रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांतून शिकून, शाश्वत पर्याय स्वीकारणे ही काळाची गरज आहे. भारतीय अनुभव त्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
अँड राहुल पडवळ, कृषितज्ज्ञ मंचर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT